Press "Enter" to skip to content

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

पनवेल(प्रतिनिधी) नवीन पनवेल सेक्टर १ एस येथील गणेश नगर झोपडपट्टी परिसरात मंगळवारी दुपारी अचानक आग लागून घरे जळून खाक झाली. त्यामुळे तेथे राहणार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगग्रस्त सात कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी आर्थिक मदत केली आहे. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ही मदत सुपूर्द करण्यात आली.

गणेश नगर झोपडपट्टी परिसरात मंगळवारी दुपारी आग लागली होती. घटनास्थळी दोन छोट्या व दोन मोठ्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, तर सहा सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाने सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवली. या आगीत सुदैवाने जीवित हानी झाली नाही, पण घरे जळून मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेची दखल घेत संवेदनशील आमदार प्रशांत ठाकूर यांनी आगग्रस्त सात कुटुंबांना आर्थिक मदत केली आहे. माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी संबंधित परिसराची बुधवारी पाहणी केली व त्यानंतर मदत सुपूर्द केली. या वेळी नगरसेवक ऍड.प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, नगरसेविका कविता चौतमोल, राजेश्री वावेकर आदी उपस्थित होते. या मदतीमुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.