Press "Enter" to skip to content

बांधकाम कामगारांसाठी पनवेल येथे ‘गोदरेज सहयोग’ आरोग्य उपक्रम

पनवेल (प्रतिनिधी) भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने (जीपीएल) ‘गोदरेज सहयोग’ या नवीन कामगार उपक्रमाची घोषणा केली आहे. कंपनीच्या प्रकल्पांच्या ठिकाणी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना मदत करण्यासाठी हा एक सुनियोजित मानसिक आरोग्य आणि कल्याण कार्यक्रम आहे. सगळे कामगार आणि गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी मेघा गोयल; गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडचे मुख्य परिचालन अधिकारी संदीप नवलखे, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे कॉर्पोरेट ऑडिट आणि ऍश्युरन्स विभागाचे व्ही. स्वामिनाथन, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे कॉर्पोरेट सेवा विभागाचे ग्रुप हेड अजय भट्ट, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्यांग दोशी आणि १ टू १ हेल्पचे मुख्य विकास अधिकारी कुणाल अशोक यांच्या उपस्थितीत गोदरेज सिटी पनवेल येथे सुरू करण्यात आलेला हा उपक्रम, सर्वसमावेशक, लोक-केंद्रित विकास आणि जबाबदार व्यावसायिक पद्धतींप्रति गोदरेज प्रॉपर्टीजच्या दीर्घकालीन वचनबद्धतेला अधोरेखित करतो.

यासंदर्भात मुंबई महानगर क्षेत्रातील सहा बांधकाम स्थळांवर सहा महिने प्रायोगिक तत्त्वावर हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. यात मानसिक शिक्षणाच्या माध्यमातून २ हजारहून अधिक कामगारांना सहभागी करून घेण्यात आले होते. आता हा उपक्रम मुंबई, दिल्ली एनसीआर, बंगळूर, चेन्नई, पुणे, हैदराबाद, कोलकाता, गुजरात आणि छत्तीसगड यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमधील ७९ निवडक बांधकाम स्थळांवर सुरू केला जाईल, ज्यामुळे अंदाजे ३० हजार कामगारांपर्यंत पोहोचता येईल.

या शुभारंभाबाबत गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज म्हणाले, “आपली शहरे आणि पायाभूत सुविधा उभारणाऱ्या लाखो लोकांच्या माध्यमातून भारताचा विकास दररोज आकार घेतो आहे. राष्ट्र उभारणाऱ्यांच्या कल्याणाची काळजी घेणे ही केवळ व्यावसायिक जबाबदारी नाही; तर ती एक सामाजिक गरज आहे. गोदरेज सहयोगच्या माध्यमातून, आम्ही श्रम प्रतिष्ठेला मान्यता देऊ इच्छितो आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्रयत्न करणे,  हा सर्वसमावेशक विकास आणि राष्ट्रनिर्माण बद्दलच्या आपल्या विचारांचा अविभाज्य भाग ठरेल याची खात्री देतो.”

बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या भावनिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणावर हा कार्यक्रम लक्ष केंद्रित करतो. कारण, येथे काम करणारे बरेच जण आपल्या कुटुंबापासून दूर असतात. प्रशिक्षित मानसिक आरोग्य व्यावसायिकांकडून २४/७ उपलब्ध असलेल्या सेवेद्वारे, हा उपक्रम सातत्यपूर्ण आणि खात्रीशीर आधार प्रदान करतो. कामाच्या ठिकाणी दरमहा गट चर्चासत्रे, वैयक्तिक समुपदेशन आणि समुपदेशन तसेच  आपत्कालीन मदतीसाठी चोवीस तास उपलब्ध असलेली दृकश्राव्य हेल्पलाइन यांचा या उपायांमध्ये समावेश आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गौरव पांडे म्हणाले, “आम्ही घरे बांधतो, पण ती बांधतानाच घरे बांधणाऱ्या लोकांची जबाबदारी घेणे, हे  देखील आमचे काम आहे, असे मानतो. आमचे अनेक बांधकाम कामगार त्यांच्या कुटुंबांपासून आणि नेहमीच्या वातावरणापासून दूर राहतात. गोदरेज सहयोग ही त्यांच्या मनस्थितीची एक पोचपावती आहे. तसेच अशी बांधकाम स्थळे निर्माण करण्याची एक वचनबद्धता आहे, जी केवळ कार्यक्षमच नाहीत, तर माणुसकी देखील जपतात.”

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.