
प्रतिनिधी वावर्ले ( सचिन पाटील) विद्या विनये शोभते आयुष्यात माणसाची खरी प्रगती ही त्यांनी घेतलेल्या शैक्षणिक गुणवत्तेवर अवलंबून असते विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वान माणसाचा आदर हा सर्व ठिकाणी केला जातो. आवरे गावातील एक हरहुन्नरी शिक्षक स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांनी आपल्या व्यावसायिक अध्यापकीय सेवेचा श्री गणेशा हा न्यू इंग्लिश स्कूल वावर्ले ता खालापूर जि रायगड या विद्यालयातुन 1997 साली ते 2005 असा प्रवास होता एक हाडाचे गणित विज्ञान विषयाचे असलेले शिक्षक असलेले अशोक ठाकूर सर हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते.
आपल्या जीवनात फक्त अध्यापन व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे तत्ववर्षी उराशी बांधून अशोक ठाकूर सर हे वावर्ले विद्यालय हे प्रगतीपथावर असताना महत्वाचे कार्य केलं होते खालापूर चौक या परिसरात आपले चांगले नाव तयार केले होते यावर्षी अशोक ठाकूर सर यांचे आकस्मितपणे निधन झाले. आपल्या आयुष्यात शिक्षकी पेशामध्ये वावर व विद्यार्थ्यांचे प्रगती हेच महत्त्वाचे उद्दिष्ट उराशी बांधून असलेले ठाकूर सर यासाठी सर यांचे भाचे श्री निवास गावंड सर यांनी यांची अशोक ठाकूर सर यांची पहिली शाळा न्यू इंग्लिश स्कूल वावर्ले ता खालापूर जि रायगड या ठिकाणी गणित व भूमिती या विषयाचे मार्गदर्शन करून तसेच येणारे एस एस सी बोर्डाची परीक्षा ही कशा पद्धतीने सामोरे जायचं तसेच प्रश्नपत्रिका सोडवून विद्यार्थ्यांचे ज्ञान पडताळणीच एक शैक्षणिक कार्य केले.
तसेच विद्यालयात विद्यार्थ्यांच्या मनात असणारी परीक्षा विषयी भीती ही दूर करून असे अनमोल मार्गदर्शन केले तसेच या वर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ योग्य ते पारितोषिक दिले जाईल अशा हार्दिक शुभेच्छा दिल्या सदर मार्गदर्शन केल्याबद्दल न्यु इंग्लिश स्कुल वावर्ले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ चांदणे एम .आर मॅडम सहाय्यक शिक्षक श्री विद्याधर पाटील सर,सहायक शिक्षक सोपान अडसरे सर ,सौ स्मिता पवार मॅडम तसेच योगेश दरेकर सर आणि शाळेच्या व्यवस्थापन कमिटी तर्फे गावंड सर यांचे अभिनंदन केले आहे अशा प्रकारे शैक्षणिक मार्गदर्शन करून अशोक ठाकूर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.सदर व्याख्यानमालेसाठी विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.गावंड सर यांनी विद्यालयास स्वर्गीय अशोक ठाकूर सरांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यालयास भिंतीवरील घड्याळ भेट देण्यात आले.





Be First to Comment