Press "Enter" to skip to content

कॉंग्रेसच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा

पनवेल शहर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने पनवेल महानगरपालिकेतील महाविकास आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळी महानगरपालिकेतील नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व नगरसेवक कटीबद्ध राहतील अशी ग्वाही देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रदेश सचिव झीशान अहमद सय्यद, रा.जि.प अध्यक्ष अनंत पाटील, जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, सुरेश पाटील, प्रवीण कांबळे व सत्कारमूर्ती नगरसेवक अरविंद म्हात्रे, हरेश केणी जनार्दन पाटील लतीफ शेख, तुषार पाटील उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे नियोजन पनवेल शहर जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांनी केले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.