Press "Enter" to skip to content

निबंध स्पर्धेत १७० तर वक्तृत्व स्पर्धेत ३५ विद्यार्थ्यांनीचा सहभाग

माजी खासदार मा. श्री. रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७५व्या अमृतमहोत्सवीवर्षानिमित्त दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे यशस्वी आयोजन

नवीन पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) च्या इंग्रजी विभागातर्फे संस्थेचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान माजी खासदार मा. श्री. रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७५व्या अमृतमहोत्सवीवर्षानिमित्त दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन उत्साहात करण्यात आले.

या स्पर्धांचा प्रारंभ ३० जानेवारी २०२६ रोजी निबंध लेखन स्पर्धेने झाला, तर ३१ जानेवारी २०२६ रोजी वक्तृत्व स्पर्धा पार पडली. या दोन्ही स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेला चालना देणे, अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे व सृजनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

 या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये महात्मा फुले आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, रामशेठ ठाकूर कॉलेज, खारघर, भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ तसेच के. बी. पी. कॉलेज, वाशी या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. निबंध लेखन स्पर्धेत एकूण १७० विद्यार्थ्यांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

 स्पर्धांचे निष्पक्ष व गुणवत्तापूर्ण मूल्यमापन करण्यासाठी बाह्य परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये प्रा. विशाल बोडले (सहाय्यक प्राध्यापक, इंग्रजी विभाग, एस.आय. ई. एस कॉलेज, नेरूळ), डॉ. रमेश यादव, प्रा. दुर्गादेवी मौर्या (रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय, खारघर) , डॉ. राम भीसे(एस.आय.ई.एस. ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी (स्वायत्त)) व डॉ. दीप्ती मंडलिक (अ‍ॅमिटी स्कूल ऑफ लँग्वेजेस, अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

 स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, आकर्षक चषक (ट्रॉफी) व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांकास रु. ५,०००/-, द्वितीय क्रमांकास रु. ४,०००/- व तृतीय क्रमांकास रु. ३,०००/- अशी रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली.

निबंध लेखन स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे :

प्रथम क्रमांक – प्रीती अरुण थोरात (प्रथम वर्ष विज्ञान शाखा)

द्वितीय क्रमांक – स्नेहा अस्त चौधरी (तृतीय वर्ष विज्ञान शाखा)

तृतीय क्रमांक – नुरुन्निहार मोहम्मद नजीम उद्दीन (प्रथम वर्ष कला शाखा)

वक्तृत्व स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे :

प्रथम क्रमांक – प्रिया शेषनाथ चौधरी (पदव्युत्तर पदवीधर विज्ञान शाखा- भाग २)

द्वितीय क्रमांक – जान्हवी भास्कर हातमोडे (पदव्युत्तर पदवीधर कला शाखा- भाग १)

तृतीय क्रमांक – साशा वायगंणकर (तृतीय वर्ष विज्ञान शाखा)

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणूनजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यअ‍ॅड. राहुल घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक सादर करताना इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. आर. व्ही. येवले यांनी स्पर्धेची ध्येय-धोरणे आणि उद्दिष्ट्ये विषद केली.

पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख मुख्य अतिथी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अ‍ॅड. राहुल घरत आपल्या भाषणात त्यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस.के.पाटील यांनी अभिव्यक्तीचे महत्व समजावून सांगताना त्याचे व्यक्तिमत्वविकासात अनन्यसाधारण महत्व असल्याचे उधृत केले. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागातील प्रा. के. एन.पाटील, तर आभार प्रदर्शन प्रा. आर. के. पाटील यांनी केले.

या दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. आर. व्ही. येवले, इंग्रजी विभागातील प्राध्यापकडॉ. एस. एन.परकाळे, प्रा. आर. के. पाटील, प्रा. के. एन.पाटील, प्रा. अम्मू उन्निकृष्णन, प्रा. एम. पी. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.