Press "Enter" to skip to content

आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

पेण तालुक्खोयात खोटे सातबारा जोडून खरेदीखत केल्याचा प्रकार

खोटा खरेदीखत केल्यामुळे प्रदीप वर्तक, दत्तात्रेय दांडेकर यांना अटक

पेण, ता. १ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील जमिनीचा सन २०१२ मध्ये ७० ब नुसार दावा सुरू असताना सुद्धा खोटे सातबारा जोडून खरेदीखत केल्याबाबतची तक्रार पेण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास केला असता येथील प्रदीप वर्तक आणि दत्तात्रेय दांडेकर यांना पेण पोलिसांनी दि. १ जानेवारी रोजी रात्री अटक केली असल्याने तालुक्यात एका खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेण तालुक्यातील मौजे पाटणोली येथील शेत सर्व्हे क २२३/० नवीन नवघर ११२ आराजी ३.५७ हेक्टर आर जमीनीवर ७० ब नुसार दावा सुरू असताना आरोपी वामन रामचंद्र माडये यांनी दिनांक सन २०१२ मध्ये खरेदी केला असून सदर जमीन खरेदी करण्यासाठी व दुरूस्ती खत करण्यासाठी जोडण्यात आलेले शेतकरी दाखला साठी मौजे सापोली येथील मिळकत ६०/० या मिळकतीचे दाखले जोडले असता सदर मौजे सापोली येथील युनुस खान यांची मिळकत अमोल कामत आणि वामन माडये यांना प्रदिप वर्तक व दत्तात्रेय दांडेकर यांनी मध्यस्थ म्हणून सन २०११ मध्ये खरेदी करून दिली त्यावेळी सदर मिळकतीचे दस्तास शेतकरी दाखला म्हणून अमोल कामत यांचे नावे मौजे दासगांव तालुका महाड भुमाक १३०अ/३ चा तसेच वामन रामचंद्र माडये यांचे नावे मौजे पाणसई तालुका माणगांव येथील भुमापन क १९८/६ चा खोटे सातबारा जोडून मध्यस्थ राहून खरेदीखत करून दिल्याची फिर्यादी सुर्यकांत पाटील रा. पाटणोली यांनी दिली होती.

त्यानुसार यामधील प्रदिप वर्तक व दत्तात्रय दांडेकर यांना पेण पोलिसांनी दिनांक ३१ जानेवारी रोजी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा क १४/२०२५ कलम ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४२०, ३४ भादवी नुसार नोंद करण्यात आहे.याबाबत आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखडे करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.