Press "Enter" to skip to content

तळोज्यात रस्ता सुरक्षा आठवडा अभियान उत्साहात साजरे

४०० पेक्षा जास्त चालकांनी घेतला शिबिराचा लाभ

तळोजा/ वार्ताहर

दीपक मायनिंग सोलुशन लिमिटेड (DMSL, K8)आणि दीपक फेर्टीलिसर्स अँण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DFPCL-K1) यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा आठवडा अभियान उत्साहात राबविण्यात आले. 400 पेक्षा जास्त चालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत या शिबिराचा लाभ घेतला. वैद्यकीय सहाय्य आणि रस्ते सुरक्षा जागरुकता यांची सांगड घालत चालकांना निरोगी जीवन प्रदान करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या उपक्रमात करण्यात आला.

या उपक्रमात चालकांना नेत्रचिकित्सेसह अन्य वैद्यकीय सेवांचे लाभ प्रदान करण्यात आले. या शिबिरामध्ये गरजू चालकांना गरज पडल्यास चष्मा खरेदी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सहाय्य प्रदान करण्यात आले. या व्यतिरिक्त सर्वसाधारण आरोग्य शिबिरामध्ये विनामूल्य औषधे देखील देण्यात आली. सदर शिबिरांमुळे 400 पेक्षा जास्त चालकांना वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात आली.

या अभिनव उपक्रमांतर्गत वाहन चालकांना रस्ता सुरक्षा तसेच सुरक्षित प्रवासाकरता आवश्यक असणाऱ्या गोष्टींबाबत अवगत करण्यात आले. नशा जन्य पदार्थांचा वापर कटाक्षाने टाळणे सीटबेल्टचा आवर्जून उपयोग करणे आणि रस्ता सुरक्षा नियमांचे काटकोर पालन करणे अशा चांगल्या सवयी अंगीभुत करण्याबाबत चालकांचे प्रबोधन करण्यात आले.

रस्ते सुरक्षा फक्त नियमांविषयी नाही — ती जबाबदारी आहे. या उपक्रमांद्वारे आम्ही चालकांना चांगले आरोग्य, जागरूकता आणि सुरक्षित पद्धती यांसाठी सशक्त करणे हे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे त्यांच्या आणि रस्त्यावरच्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेची हमी मिळेल.”

  • श्री राजेंद्र थोरात (युनिट हेड DMSL-K8)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.