Press "Enter" to skip to content

खारेपाटासह कोप्रोली गावातील समस्या सोडविण्यासाठी एक संधी द्या – समिर म्हात्रे

पेण (प्रतिनिधी) :- पेण वडखळ जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणारे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार समिर म्हात्रे प्रचारा दरम्यान कोप्रोली गावात आले असता येथील असंख्य महिलांनी त्यांना पाण्याच्या टंचाई बाबत होत असलेल्या समस्यांचे विचारले असता त्यांनी सांगितले की आजपर्यंत ज्यांना आपण निवडून दिलेत त्यांनी आपली उपेक्षाच केली मात्र आता आम्हाला खारेपाटासह कोप्रोली गावातील समस्या सोडविण्यासाठी एक संधी द्या असे वक्तव्य समिर म्हात्रे यांनी केले असता महिलांनी त्यांचे यावेळी कौतुक केले.

ठाकरे गटाकडून समिर म्हात्रे जिल्हा परिषद गटासाठी तर काँग्रेस पक्षाकडून पंचायत समितीसाठी बळीराम म्हात्रे हे दोंघे युतीद्वारे लढत असून आजच्या प्रचारात त्यांनी वाशीनाका, उंबर्डे, धोंडपाडा, कोप्रोली या भागातील मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत त्यांचे आर्शिवाद घेतले तसेच वडखळ, वाशी, वढाव, दिव, सरेभाग, काळेश्री यासह इतर गावातून सुद्धा प्रचारादरम्यान त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. एकच वादा समिर दादा, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी प्रचारादरम्यान देत आहेत.यावेळी शिवसेना कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.