

साईबाबांच्या आशीर्वादाने कल्पेश ठाकूरांची उंच भरारी : प्रसिद्ध गायक सुफी ब्रदर्स
पेण (वार्ताहर) : पेण येथील साई सहारा रेस्टॉरंटचे मालक तथा अपघातग्रस्तांचे वाली आणि साईबाबांच्या दर्शनातून सेवेचा वसा घेतलेले कल्पेश ठाकूर यांना साईबाबांच्या आशीर्वादाने त्यांची उंच भरारी होत चालली असल्याचे दिल्लीतील प्रसिद्ध गायक सुफी ब्रदर्स यांनी साई सहारा रेस्टॉरंट येथे आयोजित केलेल्या भव्यदिव्य साई भंडारा दरम्यान सांगून त्यांनी गायलेल्या दिवाना तेरा आया बाबा तेरी शिर्डी मे या कव्वालीने हजारो साईभक्त मंत्रमुग्ध झाले.ओम साई पदयात्रा मित्र मंडळ तर्फे भव्य साई भंडाऱ्याचे आयोजन साई सहारा रेस्टॉरंट पेण येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी दिल्लीवाले प्रसिद्ध गायक सुफि ब्रदर्स यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी त्यांनी साई भक्त कल्पेश ठाकूर यांच्या कार्याचा गौरव करून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थित साई भक्तांना देत त्यांना साईबाबांचा आशीर्वाद असल्याने त्यांची प्रत्येक कार्यात उंच भरारी होत राहणार असल्याचे या दरम्यान त्यांनी सांगितले.तर यावेळी कव्वाली व ऑर्केस्ट्रा सादर करत माझे साई बाबा, साई का दीदार, चढता सूरज ढळता, दिवाना तेरा आया बाबा तेरी शिर्डी में अशी अनेक गाणी गात उपस्थितांची मने जिंकली.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम साई पदयात्रा मित्र मंडळाचे सर्वेसर्वा कल्पेश ठाकूर, मितेश भानुशाली व इतर सर्व सदस्यांनी अधिक मेहनत घेतली.





Be First to Comment