
पनवेल : प्रतिनिधी
भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज ॲड मनोज भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास ॲड मनोज भुजबळ, माजी नगरसेवक—पनवेल महानगरपालिका हेमंत भुजबळ, ऋग्वेद कांडपिळे, राकेश भुजबळ, झुल्का साहेब, नितीन भुजबळ, किशोर शिंदे, अजित लोंढे, चंद्रकांत पट्टेबहादूर, संकेत भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शांत व श्रद्धाभावाने करण्यात आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.






Be First to Comment