
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या पुनर्रचनेच्या
पार्श्वभूमीवर शिवसनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन सादर
पनवेल : प्रतिनिधी
कामोठे पोलीस ठाणे पनवेल विभागातच ठेवण्याची मागणी. नुकतीच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पुनर्रचनेला गृह विभागाने मंजुरी दिल्यानंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नव्या परिमंडळाची तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विभागाच्या पुनर्रचनेची घोषणा केली.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे स्थानिक नेते व पोलिस मित्र चंद्रशेखर सोमण यांनी नुकतीच पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. त्यावेळी भारंबे यांचे अभिनंदन केले.
नवीन रचनेत सहाय्यक पोलीस आयुक्त स्तरावर फेरबदल झाले असून कामोठे पोलीस ठाणे खारघर विभागात वर्ग केले आहे. याविषयी चंद्रशेखर सोमण यांनी तपशीलवार चर्चा करून कामोठे पोलीस ठाणे पनवेल विभागातच ठेवण्याची विनंती केली आहे. चंद्रशेखर सोमण हे गेले 30 वर्षाहून अधिक वर्षे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या विविध सुधारणा उपक्रमांशी संलग्न आहेत. नवी मुंबई आयुक्तालयाच्या जडणघडणीत सोमण यांचे मोठे योगदान राहिले आहे. याबाबतीत आयुक्त मिलिंद भारंबे यांनीही सविस्तर भूमिका विषद केली. सदरच्या विनंतीबरोबरच इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीचाही आढावा घेण्याचे त्यांनी तात्काळ आदेश दिले. सहपोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलच्या उपायुक्तांना सदर बाबतीत तातडीने अहवाल देण्यास सांगितले. याबरोबरच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत द्रोणागिरी, करंजाडेसहित अजून किमान तीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले. चंद्रशेखर सोमण यांनी सदर कामी पुढाकार घेतल्याबद्दल पोलीस आयुक्त आणि सहपोलिस आयुक्तांचे आभार मानले.
https://www.instagram.com/reel/DMsRcFxtx2P/?igsh=aTdtaDBkdm05bm50
तसेच सध्या सर्व पोलीस ठाण्यांच्या आणि सहाय्यक पोलीस आयुक्त आणि उपायुक्त कार्यालयांचे महानगर टेलिफोन बंद असल्याने नागरिकांना संपर्कासाठी अडचण होत असल्यामुळे तात्काळ सर्व पोलीस ठाण्यांसाठी व वरिष्ठ कार्यालयांसाठी एक नवीन मोबाईल नंबर घेऊन त्याचा संपर्क क्रमांक सर्वसामान्यांसाठी प्रसिद्ध करण्याची मागणीही चंद्रशेखर सोमण यांनी केली.
चंद्रशेखर सोमण यांनी सह पोलिसायुक्त संजय येनपुरे यांच्याशी चर्चा करून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्यविषयक काही उपक्रमांची चर्चा केली. येनपुरे यांनी सदर सूचनांचे स्वागत करून अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली




Be First to Comment