Press "Enter" to skip to content

हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी लिहिलेला लेख

“लव्ह जिहाद : धर्मनिरपेक्षतेच्या आड दडलेले जिहादी आक्रमण”


सध्या महाराष्ट्रात विविध माध्यमातून हिंदूंचा बुद्धिभेद करून धर्मा पासून दूर नेण्याचा विडाच जणू काहींनी उचलला आहे. विविध नावाखाली करत आहे. कुठे वारीमध्ये समरसता वारी या गोंडस नावाखाली श्रद्धेला तडा देण्याचे कार्य होतांना दिसत तर कुठे हिंदूंचा वंशविच्छेद करणाऱ्या लव्ह जिहाद सारख्या महाभायंकर षडयंत्राला काल्पनिक प्रचार असल्याचे सांगून हिंदूंचा बुद्धिभेद करण्यात येत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) एका कार्यकर्त्याने ‘लव्ह जिहाद’ ही कल्पना न्यायालय, सरकार किंवा तपास यंत्रणांनी सिद्ध केलेली नाही. या संकल्पनेचा वापर मुस्लिमद्वेष आणि राजकीय ध्रुवीकरणासाठी होतो. काही राज्यांनी यासंदर्भात कायदे केले, पण त्यात स्पष्ट पुरावे किंवा व्याख्या नाही. ‘लव्ह जिहाद’ हा एक राजकीय प्रचार असून तो समाजात भीती आणि द्वेष पसरवतो. थोडक्यात ‘लव्ह जिहाद’ ही एक तथ्याधारित नसलेली, राजकीय हेतूने पसरवलेली सामाजिक भीतीची संकल्पना आहे असे मत ‘लव्ह जिहाद : भ्रम आणि वास्तव’ या लेखात मांडले आहे, आणि एका प्रसिद्धी माध्यमांनी याला प्रसिद्धी पण दिली आहे. अंनिस ने यावर कुठेही आक्षेप घेतला नाही म्हणजे याला अंनिस चे समर्थन आहे असे समजायचे का? ‘लव्ह जिहाद’ ही संकल्पना केवळ एक राजकीय प्रचार असल्याचा आरोप अनेक पुरोगामी मंडळी करतात, मात्र प्रत्यक्ष वास्तव त्यांच्या दाव्यांना छेद देते.

या संबंधात न्यायालयात सुरु असलेले अनेक खटले, तपास यंत्रणांनीसमोर आणलेले पुरावे आणि विविध राज्य सरकारांच्या कारवाईतून ‘लव्ह जिहाद’चे अस्तित्व वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.

श्रद्धा वालकरच्या शरीराचे तुकडे करणारा आफताब असो, की रूपाली चंदनशिवेची भररस्त्यात गळा चिरणारा इक्बाल शेख ही प्रकरणे नुसते क्रौर्य दाखवत नाहीत, तर एका जिहादी मानसिकतेचा सूक्ष्म पण भयावह चेहरा उघड करतात. समाजातील अशा असंख्य घटनांची साखळी पाहता ‘लव्ह जिहाद’ ही केवळ एक कल्पना नाही, तर भयावह वास्तव असल्याचे स्पष्ट करते. केरळ आणि कर्नाटक उच्च न्यायालयांचे निरीक्षण, पोलिस व गुप्तचर संस्थांचे अहवाल, तसेच उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यांनी या संदर्भात केलेले कायदे हे ‘लव्ह जिहाद’चे वास्तव अधोरेखित करतात. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ ही सामाजिक वास्तवाशी संबंधित, धर्म आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने गंभीर चिंतनाचा विषय असून, त्याचे अस्तित्व नाकारणे म्हणजे हिंदु तरुणींच्या सुरक्षेच्या प्रश्नावर दुर्लक्ष करणे होय.

कर्नाटक आणि केरळमध्ये लव्ह जिहादचे थैमान !

काही वर्षांपूर्वी केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के.टी. शंकरन् यांनी लव्ह जिहादचे अस्तित्व मान्य करून त्या वेळेचे केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंदन यांना त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा त्यांना लव्ह जिहादची शेकडो प्रकरणे आढळून आली होती. काही वर्षांपूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयात लव्ह जिहादमध्ये फसलेल्या एका तरुणीने खटला प्रविष्ट केला होता. या खटल्याच्या निमित्ताने कर्नाटकच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (‘सीआयडी’ने) चौकशी केली असता ‘एकट्या कर्नाटकात प्रतिवर्षी अनुमाने ३६ सहस्र हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडतात’, असे दिसून आले.

लव्ह जिहाद करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद चा वापर निर्दयी !

‘भारतात प्रतिवर्षी सहस्रो हिंदु मुली लव्ह जिहादच्या बळी ठरतात’, हे वास्तव आहे. मध्यंतरी हिंदु धर्मातील कोणत्या जातीच्या मुलीला लव्ह जिहादच्या जाळ्यात फसवणार्‍या मुसलमान तरुणाला किती लाखांचे पारितोषिक मिळेल, याचे एक मूल्य(दर)पत्रकच प्रसिद्ध झाले होते. ‘हिंदु मुलींना जाळ्यात अडकवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्वच मार्गांचा वापर करण्यात येतो’, हेही दिसून आले आहे. हिंदु नाव आणि हिंदु वेश धारण करणे, कपाळावर टिळा लावणे इत्यादी मार्गाने अनेक हिंदु मुली लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकल्या आहेत. राष्ट्रीय शूटर तारा सहदेव वर्ष २०१४ मध्ये ‘रणजीत कोहली’ उर्फ रकीबुल हसनच्या लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकली; त्याने आणि त्याच्या आईने हिंदू असल्याचे खोटे भासवून तिच्याशी विवाह केला आणि फसवणूक केली. वैद्यकीय क्षेत्र, न्यायदान करणारी महिला, आय.ए.एस्.ची सिद्धता करणारी तरुणी अशा सर्वच क्षेत्रांतील मुलीही फसत चालल्याने हे गंभीर आहे. हरियाणातील बल्लभगडमधील अग्रवाल महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर हिंदु तरुणी निकिता तोमर हिची तौसिफ याने गोळ्या झाडून हत्या केली. ‘लव्ह जिहाद’चा कायदा अस्तित्वात असता तर ? आज निकिता तोमर जिवंत असती. निकिता तोमर हिच्या हत्येस जबाबदार कोण ? ‘लव्ह जिहाद अस्तित्वात नाही’, असे म्हणणार्‍यांनी याचे उत्तर द्यायला हवे.

मुलींना आमिष दाखवून लव्ह जिहादला बळी पडण्याचे षडयंत्र!

याविषयी ताजे उदाहरण घ्यायचे झाल्यास जमालुद्दीन उपाख्य ‘छांगूर बाबा’ चे घेऊ शकतो. राज्यातील धर्मांतराचा सूत्रधार ‘छांगूर बाबा’ याला ५ जुलैला आतंकवादविरोधी पथकाने बलरामपूर येथून अटक केली. त्याच्यावर ५० सहस्र रुपयांचे बक्षीस होते. जमालुद्दीन स्वतःला हाजी पीर जमालुद्दीन म्हणवून घेत असे. तो मुलींना आमिष दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडत असे. विशेष असे की, हिंदु मुलींच्या जातीनुसार त्यांचे दर निश्चित करण्यात आले होते. हे काम करण्यासाठी त्याच्या ४० पेक्षा अधिक बँक खात्यांमध्ये तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी होता. जमालुद्दीन याने पाकसह अनेक मुसलमान देशांमध्ये किमान ४० वेळा प्रवास केला होता. त्याने ‘शिजर-ए-तैयबा’ नावाचे एक पुस्तकही प्रकाशित केले होते. याचा वापर करून तो हिंदूंचा बुद्धीभेद करत असे. छांगुर बाबाची योजना उत्तरप्रदेशातील जिल्ह्यांची लोकसंख्येची रचना पालटून तेथे इस्लामी राष्ट्र स्थापन करण्याची होती, अशीही माहिती पोलिसांना मिळाली.

दुसरे उदाहरण नुकते 2 महिन्यांपूर्वी भोपाळ मध्ये उघड झालेले ‘ लव्ह जिहाद रॅकेटचे’ आहे. लग्झरी लाइफस्टाईलचे आमिष दाखवून हिंदू मुलींना जाळ्यात अडकवणे, या प्रकरणात मुलींना अडकविण्यासाठी महिलांचे सहाय्य घेतल्याचेही उघडकीस आले आहे.

या प्रकरणा संदर्भात राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने मोठे खुलासे केले आहेत. एनएचआरसी च्या प्रियांक कानूनगो यांनी म्हटले आहे कि जाणुन बुजून हिंदू मुलींना निशाणा बनवले जात आहे.

लव्ह जिहाद’च्या संदर्भातील विविध सर्वेक्षणाचे अहवाल !

देशातील ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात एक अहवाल समोर आला आहे. यानुसार ५३ टक्के लोकांनी सांगितले की, मुसलमान पुरुष ‘लव्ह जिहाद’मध्ये सहभागी आहेत, असे म्हटले आहे. या संदर्भातील सर्वेक्षणामध्ये १ लाख ४० सहस्र लोकांचे मत घेण्यात आले होते. ‘इंडिया टुडे’ आणि ‘सी वोटर यांनी ‘मूड ऑफ द नेशन’ अंतर्गत हे सर्वेक्षण केले होते. यात इंडिया दुडेने १ लाख ४० सहस्र ९१७ लोकांना प्रश्‍न विचारले, तर सी वोटरने १ लाख ५ सहस्र लोकांच्या मुलाखतींचे विश्‍लेषण केले. त्यानंतर त्यांनी निष्कर्ष काढला.

लव्ह जिहादचे भयावह सत्य नाकारणे म्हणजे न्यायव्यवस्था,
पोलिस यंत्रणा आणि प्रशासन यांना खोटे ठरवणे होय !

अनेक तथाकथित पुरोगाम्यांनी ‘लव्ह जिहाद’ नाकारले असले, तरी केरळ उच्च न्यायालय, कर्नाटक सीआयडी व अन्य यंत्रणांनी याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांनी त्याविरोधात कायदे केल्याचा अर्थ ‘तो अस्तित्वात आहे’, हेच स्पष्ट होते. कित्येक चॅनल्सही आता लव्ह जिहादचे दरपत्रक (कुठल्या जाती-धर्माच्या मुलीला प्रेमात पाडल्यास किती पैसे मिळणार याचे पत्रक) प्रसिद्ध करत आहेत. कायद्यानेच बघायचे झाले, तर लव्ह जिहादचे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. आणि दररोज नवीन तक्रारी मोठ्या प्रमाणात प्रविष्ट होत आहेत. तेव्हा प्रश्न असा की, पुरावे आणि सत्य समोर असतानाही काही मंडळी सत्य नाकारण्याची चिवट भूमिका घेत आहेत. हे म्हणजे जिहादींना पाठिंबा देणे आणि न्यायव्यवस्था, पोलिस यंत्रणा आणि प्रशासन यांना खोटे ठरवणे नव्हे का?

लव्ह जिहादचे अस्तित्व नाकारणे म्हणजे समाजाची दिशाभूल करण्याचे षड्यंत्रच!

‘लव्ह जिहाद’ ही धार्मिक युद्धातील एक छुपी रणनीती आहे. इस्लामी आक्रमणांतील ‘माल-ए-गनीमत’ संकल्पनेचा आधुनिक अवतार म्हणजेच लव्ह जिहाद! साम, दाम, दंड, भेद या नीतींनी हिंदु तरुणींना जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर, फसवणूक, अत्याचार हे जिहादी मानसिकतेचे विकृत स्वरूप आहे. दिल्लीत आफताब पूनावाला याने हिंदु युवती श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे केल्याची घटना घडली होती. श्रद्धाची हत्या हे एकमेव प्रकरण नाही. त्यापूर्वी आणि नंतरही निधी गुप्ता, अंकिता सिंह, निकिता तोमर, काजल, मानसी दीक्षित, तनिष्का शर्मा, खुशी परिहार, वर्षा चौहान, हिना तलरेजा आदी हिंदु तरुणींसमवेतही अशाच प्रकारची क्रूरता झाली आहे. ‘दी केरला स्टोरी या चित्रपटाने मांडलेले वास्तव केवळ केरळ राज्यापुरते मर्यादित नसून या जिहादी षड्यंत्राची व्याप्ती देशभरातच नव्हे तर जगभरात मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. सध्या लव्ह जिहादच्या आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक मुलींचे मृतदेह बंद सुटकेसमध्ये मिळाले आहेत. तरीही देशातील धर्मनिरपेक्षता वाद्यांनुसार हा ‘लव्ह जिहाद’ नाही, तर मग काय आहे ? जेव्हा एखादी तरुणी लव्ह जिहादमध्ये फसते, तेव्हा फार मोठ्या जिहादी लोकसमुहाचा व्यापक कट त्यामागे असतो, असे सखोल निरीक्षणानंतर जवळपास प्रत्येक प्रकरणात दिसून आले आहे. अपवाद असतीलच तर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. त्यामुळे लव्ह जिहादचे अस्तित्व नाकारणे म्हणजे समाजाची दिशाभूल करण्याचे षड्यंत्रच आहे.

लवकर कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे !

‘द केरल स्टोरी’चे निर्माते विपुल शाह यांनी धर्मांतराला बळी पडलेल्या २६ पीडित मुलींना समाजासमोर आणले होते.

२६ पीडित मुली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर येणे, म्हणजे ‘धर्मांतर आणि आतंकवाद अस्तित्वात आहे’, हे सिद्ध होते ! तसेच भोपाळ रॅकेट संदर्भात एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तक्रार केली होती की मुस्लीम समाजातील एक समूहाने त्यांचे शोषण केले आहे. २० वर्षां पूर्वीपासून अगदी उघडपणे संपूर्ण भारतात ही प्रकरणे चालू होती. त्याची भयावहता अधिक असूनही राजकीय पटलावर दुर्दैवाने गेली कित्येक वर्षे हे आक्रमण चक्क नाकारले जात होते, लव्ह जिहादचा वणवा आटोक्याबाहेर गेला असतांना सुद्धा काही समाजकंटक ‘लव्ह जिहाद’ म्हणजे राजकीय खेळी, खोटे प्रचार तंत्र असे सांगून आगीत तेल ओतण्याचे काम करत आहोत. मुळात ‘लव्ह जिहाद’ ही संकल्पना नाही तर एक महाभयंकर कटु सत्य आहे.

हे षडयंत्र मोडून काढण्यासाठी वास्तव घटनांकडे, पीडितांच्या अनुभवांकडे आणि तपास यंत्रणांच्या नोंदींकडे डोळसपणे पाहणे आवश्यक आहे. यासंबंधी अनेक घटनांचे वास्तव, न्यायालयीन निरीक्षणे, तपास यंत्रणांचे निष्कर्ष आणि राज्यस्तरीय कायदे हे सर्व एकच गोष्ट स्पष्ट करतात ‘लव्ह जिहाद’ ही काल्पनिक संकल्पना नाही, तर एक संगठित, योजनाबद्ध क्रूर षडयंत्र आहे. यावर निष्क्रिय राहणे म्हणजे भविष्यातील हजारो श्रद्धा, निकिता, अंकिता यांना मरणाच्या कुशीत ढकलणे होय. त्यासाठी केंद्र व राज्य शासनांनी ‘लव्ह जिहाद’च्या संकल्पनेवर आधारित घटनासंमत, कठोर आणि प्रभावी कायदे तात्काळ करावेत. या कायद्यांची अंमलबजावणी पक्षनिष्ठेच्या पलीकडे जाऊन निष्पक्षपणे व्हावी. तसेच ‘लव्ह जिहाद’ ला खोटी संकल्पना भासवून समाजाची दिशाभूल करणाऱ्यांना कठोर शासन करावे. ही काळाची गरज झाली आहे.

संकलक – श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती

(संपर्क : 70203 83264)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.