Press "Enter" to skip to content

तक्का कॉलनीतील राजस्थानी स्मशानभूमी मध्ये पनवेल महानगरपालिका उद्यान विभागामार्फत वृक्षारोपण

पनवेल महानगरपालिका उद्यान विभाग आणि सामाजिक कार्यकर्ते श्री.गणेश वाघिलकर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ७ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम तक्का कॉलनीतील राजस्थानी स्मशानभूमी परिसरात पार पडला.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मा. आयुक्त श्री. मंगेश चितळे साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त श्री. गणेश शेटे साहेब आणि मा. उपायुक्त डॉ. वैभव विधाते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा आणि नागरिकांना मोफत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पनवेल महानगरपालिका उद्यान विभागामार्फत सुरू आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत तक्का कॉलनीतील राजस्थानी स्मशानभूमी परिसरात पनवेल महानगरपालिकेतील उद्यान विभाग आणि सामाजिक कार्यकर्ते श्री.गणेश वाघिलकर यांच्या मार्फत देव चाफा, जांभूळ, पेरू, चिकू, बहावा, सुपारी अशा विविध प्रकारच्या 21 वृक्षांचे रोपण करण्यात आले.
स्मशानभूमी परिसरात वृक्षरोपणामुळे नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होईल तसेच स्मशानभूमी परिसराचे देखील संवर्धन होण्यास मदत होईल.

मा. उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मा. सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने व विभागप्रमुख श्री. अनिल कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागातील उद्यान पर्यवेक्षक श्री. सिद्धार्थ कांबळे, अशोक मुने तसेच सहाय्यक उद्यान पर्यवेक्षक किरण गायकवाड व गजलक्ष्मी आंबे यांचे या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.