
पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : सिंधुदुर्ग रहिवाशी हितवर्धक संघ पनवेलचे सभासद हर्षल प्रसन्नकुमार घागरे यांच्या नेतृत्वाखाली बेलमॅक टेरा ऑलीव्ह सोसायटीतील युवकांतर्फे फलटण येथे जाऊन निश्वार्थ सेवा अंतर्गत पहाटे 5 पासून दुपारी 12 वाजेपर्यंत सुमारे 7 ते 8 हजार वारकर्यांना चहा, बिस्किटे, नाष्टयाची सेवा देण्यात आली.
त्यानंतर हे युवक जागोजागी सेवा पुरवीत पंढरपूर येथे जाऊन विठू माऊलीचे दर्शन घेऊन परतणार आहेत. त्यांच्या या सेवा कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Be First to Comment