Press "Enter" to skip to content

श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था व शिवराज युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक वस्तू वाटप व मोफत आरोग्य चिकित्सा

 कोणत्याही  सामाजिक संस्था म्हणजे समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सामाजिक जीवन व्यवस्थित चालवण्यासाठी या संस्था कार्यरत असतात. या संस्था समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात. गरीब, गरजू ,दुर्बल घटकांना या आपल्या सामाजिक उपक्रमातून या संस्था  आधार देत असतात. त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्याच्या बाबतीत या संस्था सामाजिक बांधिलकीची जाणीवेतून आपले योगदान देत असतात.
   
अशीच एक उरण तालुक्यातील  सामाजिक संस्था  श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था व शिवराज प्रतिष्ठान उरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ जून २०२५ रोजी पिरवाडी आदिवासी वाडी येथे जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
 
या कार्यक्रमासाठी पिरवाडी आदिवासी वाडी येथील आदिवासी बांधव भगिनी व लहान मुले बहुसंख्येने उपस्थित होते. आदिवासी बांधवांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर प्रथम येथील महिलांची व लहान मुला़ंची आरोग्य तपासणी झाली. डॉ  दया परदेशी यांच्या मार्फत जवळपास ४० रुग्णांची आरोग्य तपासणी झाली व त्यांना मोफत औषधे देण्यात आली. त्यानंतर प्रत्येक कुटुंबासाठी जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. जवळजवळ ४५ जीवनावश्यक किट्स यावेळी देण्यात आले.

या उपक्रमासाठी शिवराज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश भाई ठाकूर, श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्थेच्या कार्याध्यक्षा रायगड भुषण संगीता ताई ढेरे, कविता म्हात्रे ,पूजा प्रसादे, मीना रावल, विशाखा म्हात्रे, अनघा ठाकूर, रश्मी तांबे ,सीमा निकम, सुमन ताई तोगरे, श्रेया ठाकूर, तृप्ती भोईर ,योगेश म्हात्रे ,उमेश वैवडे, सचिन ढेरे, केशव निकम, दिनेश हळदणकर, अमर ठाकूर ,आनंद ठक्कर, श्याम भोईर, सुभाष पाटील ,संग्राम काका तोगरे, दीपक प्रसादे या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले.
 त्याचप्रमाणे पिरवाडी  आदिवासी वाडी येथील बांधवांचे ही  उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.