
पनवेल दि.२८ (संजय कदम): पायी चालत जाणा-या पुरुष इसमाच्या गळयातील चैन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलीस ठाणे कडून गुन्हा दाखल झाल्यापासून १२ तासाच्या आत जेरबंद करून गुन्हयातील १ लाख ६० हजार रू किंमतीचे सोन्याचे दोन चैनी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात होत असलेल्या चैन जबरी चोरीच्या गुन्हयाना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व पोलीस सह आयुक्त संजय एनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दिपक साकोरे तसेच पोलीस उपायुक्त सो, परि ०२, पनवेल प्रशांत मोहिते, सहा पोलीस आयुक्त भाउसाहेब ढोले यांनी वेळोवेळी सुचना केल्या होत्या, त्यानुसार सोन्याच्या चैनीच्या चोरीचा टॉप्स करत असताना खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चोरीच्या गुन्हयाच्या घटनास्थळी तात्काळ भेट देवून वपोनि स्मिता ढाकणे, पोनि (गुन्हे) सचिन परदेशी यांच्या सुचनेनुसार गुप्त बातमीदारांच्या प्राप्त माहीती वरून आरोपी प्रेम संजय सोनवणे (वय २३ वर्षे, रा- मोहपाडा) आणि तकदिर राजेश साळुंखे (वय २२ वर्षे, नवनाथ नगर झोपडपट्टी, पनवेल) यांना नवीन पनवेल परिसरात, सापळा कारवाई करून शिताफिने ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.
नमूद आरोपीताकडे केलेल्या तपासात आरोपी कडून गुन्हयातील जबरीने चोरी करून नेलेले सोन्याचे चैनी असे एकूण १ लाख ६० हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई खांदेश्वर पोलीस ठाणेचे सपोनि प्रताप बंडगर, पोउनि वणे, पोहवा उदय देसाई, पोहवा महेश कांबळे, पोहवा किसन पाटील, पोहवा धिरेंद्र पाटील, पोशि उत्तम शेंडे, पोशि सचिन पवार, पोशि स्वप्निल कोळी, पोशि संदीप तरटे, यांनी केली आहे. दरम्यान सदर गुन्हयाचा तपास पोउनि दत्तात्रय वणे कत आहेत.

Be First to Comment