
पनवेलमधील पनवेल कल्चरल सेंटर या संस्थेला, त्यांच्या कार्यालयीन दैनंदिन कामकाजासाठी अद्ययावत कॉन्फिगरेशनचा “ऑल इन वन डेस्कटॉप संगणक” आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वतीने देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आला. ही मदत संस्थेच्या कार्यक्षमता आणि प्रभावी प्रशासनात निश्चितच मोलाची ठरणार आहे. या वेळी पनवेल कल्चरल सेंटरचे श्रीधर सप्रे, चंद्रकांत मने, अभिषेक पटवर्धन, शामनाथ पुंडे, चिन्मय समेळ, अमोल खेर, गणेश जगताप आणि आदित्य उपाध्ये उपस्थित होते.

Be First to Comment