
नवीमुंबई विमानतळाला दिबांच्या नावाबाबत आजतरी सरकारला सुबुद्धी सुचेल का ? महेंद्र घरत यांचा सरकारला सवाल !
उलवे, ता. २४ : लोकनेते दि. बा. पाटील शेवटच्या श्वासापर्यंत न्याय हक्कांसाठी लढले. देशपातळीवरील गोरगरिबांसाठी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलेल्या नेत्यांमध्ये ते आहेत. उरणमध्ये प्रकल्पग्रस्तांचे जे ऐतिहासिक आंदोलन झाले, त्यांचे ते प्रणेते आहेत. त्या आंदोलनात पाच हुतात्मे झालेत. त्यामुळे यांची जाण ठेवून तरी नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावाबाबत आजतरी सरकारला सुबुद्धी सुचेल का ? दिबांचा आज १२ वा स्मृतिदिन आहे. म्हणजे ते जाऊन एक तप झाले. सरकार किती दिवस चालढकल करणार, असे रोखठोक मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी दिबांच्या स्मृतीस अभिवादन करताना व्यक्त केले.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत काॅ. भूषण पाटील जासई येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांना महेंद्र शेठ घरत यांनी काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. दि. बा. पाटील साहेब ही आमची अस्मिता आहे तिला नख लावण्याचे धाडस कुणी करू नये, असे मतही महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केले.

Be First to Comment