

पेण, ता. २० (वार्ताहर) : शिवसेना पक्षप्रमुखांनी समाजकारणाशी एकनिष्ठ राहून राज्यातील दिन दुबळ्या घटकांना महत्त्व प्राप्त करून दिले आहे.त्याच हेतूने पेण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवावे असे आवाहन रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त पेणच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.तर यावेळी ते म्हणाले की येणाऱ्या काळात येथील वैद्यकीय सेवा, शैक्षणिक क्षेत्रातील काम, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध यासह महिला सक्षमीकरण या सर्व गोष्टी कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या शिवसैनिकांना करावयाचे आहे त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने शिवसैनिकांनी काम करावे असे सांगितले.तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा कसा फडकेल याकडे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे आपल्या ग्रामीण भागात घर टु घर जाऊन कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा उद्देश नागरिकांना पटवून दिले पाहिजे तरच प्रत्येक माणूस आपल्याशी जोडला जाईल असे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
सदर कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, शहर प्रमुख सुहास पाटील, माजी तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर, महिला आघाडीच्या दिपश्री पोटफोडे, दर्शना जवके, लहूशेठ पाटील, भगवान पाटील, चेतन मोकल, लवेंद्र मोकल, संतोष पाटील, दीपक पाटील, नंदू मोकल, ईश्वर शिंदे, राजू पाटील, वसंत म्हात्रे, धन्वंती दाभाडे, मेघना चव्हाण, वैशाली समेळ, चंद्रहास म्हात्रे, गुरु पाटील, लक्ष्मण खाडे, प्रसाद म्हात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम म्हात्रे, एस.एम.पाटील आदिंसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment