
तृप्ती भोईर : उरण /प्रतिनिधी
महिला सक्षमीकरण आणि मानवता सक्षमीकरण हे ब्रीदवाक्य असलेली हि आरोग्य सेवा म्हणजेच आजारांचे निदान, उपचार आणि त्यावर प्रतिबंध करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सेवेला वैद्यकीय सेवा म्हणतात आणि या अशा वैद्यकीय सेवेमुळे एखाद्या व्यक्तीचे आरोग्य तर उत्तम होतेच पण त्या व्यक्तीला जीवनदान मिळते. डॉक्टर रुग्ण यांच्यातील हे नाते विश्वास, आदर, संवाद यावर आधारलेले असते.
अशा या वैद्यकीय सेवेचे इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर (आय.सी.टी.सी.) यांच्या संयुक्त विद्यमाने उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन कडून ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती आणि मोफत थर्मल मेमोग्राफी शिबिराचे आयोजन हॉटेल भोईर गार्डन कोट नाका उरण येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते.
डॉ. घनश्याम पाटील (अध्यक्ष उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन) डॉ. सलील पाटकर (आय.सी.टी.सी वाशी आणि पनवेल) डॉ. सत्या ठाकरे (सेक्रेटरी उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन) डॉ. सचिन गावंड (खजिनदार उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. त्याचप्रमाणे उरण मधील महिलांच्या विविध सामाजिक संस्था वुमेन ऑफ विस्डम सामाजिक व शैक्षणिक संस्था उरण, कुटुंबिनी महिला संघ उरण, कलश इंटरटेनमेंट, माई फाउंडेशन, पत्रकार उत्कर्ष समिती , स्वर्गीय तृप्ती सुधीर सुर्वे फाउंडेशन, महालन सामाजिक संस्था उरण, आधार फाउंडेशन या संस्थांचा यामध्ये सहभाग होता.
डॉ. संगीता डाके (एमडी गायनोलॉजिस्ट) डॉ. मोना बोरकर (एमडी
गायनोलॉजिस्ट)डॉ.कृष्णा बोरकर (गायनालॉजिस्ट )डॉ. रंजना म्हात्रे (सांस्कृतिक सेक्रेटरी) डॉ. शुभांगी मोकल (सांस्कृतिक सेक्रेटरी) डॉ. सुलोचना पाटील, डॉ. राणू ठाकरे, डॉ.प्राजक्ता कोळी, डॉ. दया परदेशी डॉ. सविता डेरे, डॉ.वनिता पाटील या महिला डॉक्टरांनी या शिबिरासाठी महत्वाचे योगदान दिले आहे.

स्तनाचा कर्करोग हा भारतासह जगभरातील महिलांना प्रभावित करणारा एक महत्त्वाचा आरोग्यविषयक चिंतेचा विषय आहे. याविषयी उपचारांचे निकाल सुधारण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी लवकर निदान आणि वेळेवर हस्तक्षेप करणे अत्यंत महत्त्वाचे आहे या विषयावर जागरूकता वाढवणे स्तनाच्या कर्करोगाचे निदान झालेल्यांना मदत करणे, या रोगाविषयीचे सखोल मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, महिलांच्या मनातील या आजाराविषयीची भीती घालवण्यासाठी आजचे उरण डॉक्टर वेल्फेअर असोसिएशनने घेतलेले शिबिर हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जागृती निर्माण करणारे होते.
या शिबिराची सुरुवात मंगलमय वातावरणात झाली. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उरण मेडिकल वेलफेअर असोशिएशन चे पेट्रन डॉ.सुरेश पाटील,आणि डॉ. मंगेश डाके हे उपस्थित होते. मांगल्याचे प्रतीक असलेले दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली येणाऱ्या प्रत्येक महिलेला बसण्यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांच्या व्याख्यानातून त्यांच्या मनातील भीती घालवण्यात आली. दिवसभरात ८५ महिलांची थर्मल मेमोग्राफी करण्यात आली. उर्वरित महिलांची दिनांक १०/३/ २९२५ रोजी भोईर गार्डन या नियोजित ठिकाणीच करण्यात येणार आहे .
आजार आणि भीती हे समीकरण असले तरी आजचे शिबिर मात्र महिलांनी मनातील भीती घालवून मोकळ्या मनाने या शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला या शिबिरा करता फक्त उरण मधूनच नाही तर उरणच्या आजूबाजूच्या गावातूनही महिला सहभागी झाल्या होत्या. सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत या शिबिरात महिलांच्या थर्मल मेमोग्राफीची चाचणी घेण्यात आली.
मेडिकल वेल्फेअर असोसिएशनची संपूर्ण टीम त्याचप्रमाणे सीमा घरत महालण सामाजिक संस्था, श्लोक पाटील कलश इंटरटेनमेंट आणि कुटुंबिनी महिला संघ, कल्पना सुर्वे स्वर्गीय तृप्ती सुधीर सुर्वे फाउंडेशन, सारिका पाटील वुमन ऑफ विस्डम सामाजिक आणि शैक्षणिक संस्था ,रंजना म्हात्रे पत्रकार उत्कर्ष समिती ,अश्विनी धोत्रे आधार फाउंडेशन ,निलिमा थळी वुई क्लब उरण,सुरेखा भोईर वुई क्लब द्रोणागिरी भावना भोईर ,रंजना म्हात्रे, तृप्ती भोईर आदी सामाजिक संस्थांच्या महिला हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सहभागी झाल्या होत्या.
उरणच्या महिलांना उरण डॉक्टर वेल्फेअर असोसिएशन कडून हि दिलेली आरोग्य सेवा एक अनमोल अशी भेट होती.त्यामुळे आलेल्या प्रत्येक महिलेने या आरोग्य सेवे विषयी कृतज्ञता व्यक्त केली.

Be First to Comment