
पेण, ता. २२ (वार्ताहर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी तसेच १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व दारूचे दुकाने बंद करून या दिवशी ड्राय डे घोषित करावा अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी मुख्यमंत्री यांना देऊन केली आहे.

एकीकडे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच देशाचा प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन यासह निवडणुकीदरम्यान राज्यभर ड्राय डे घोषित करण्यात येतो मात्र संपूर्ण जगात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि देशभरात शिवजयंती साजरी होत असताना अनेक ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक तसेच शिवजयंती निमित्त मिरवणुका, शिव व्याख्याने यासह गडकिल्ल्यांचे संवर्धन आदि कार्यक्रम होत असतात त्यामुळे या आदर्शांचे आचरण करता राज्य सरकारने या दोन दिवशी सर्वत्र दारूचे दुकाने (ड्राय डे) घोषित करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



Be First to Comment