Press "Enter" to skip to content

महाराष्ट्रातील गणेश मूर्तिकार पेणमध्ये एकवटले

गणेशमूर्ती कारखानदारांवर आलेले पीओपीचे विघ्न दूर करण्यासाठी प्रयत्नशील – माजी आमदार अनिकेत तटकरे

पेण, ता. २१ (वार्ताहर) : राज्यातील पीओपीच्या गणेशमूर्तीवर आलेल्या संकटामुळे येथील कारखानदार विवेचनात असल्याने या लढाई करता आपण कारखानदारांच्या बरोबर असून या अगोदर याच संदर्भात विधिमंडळामध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नावर तात्पुरती का होईना त्यावेळी स्थगिती देण्यात आली मात्र आता पुन्हा गणेशमूर्ती कारखानदारांवर आलेले संकट दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पेण येथे बोलून दाखविले.

महाराष्ट्र गणेश मुर्तीकार संघटना हमरापूर विभाग गणेश मुर्तीकार उत्कर्ष मंडळ आयोजित पेण येथील आगरी समाजाला हॉल येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला माजी आमदार अनिकेत तटकरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर, महाराष्ट्र राज्य अखिल सार्वजनिक उत्सव समिती अध्यक्ष हितेश जाधव,मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, माजी अध्यक्ष कुणाल पाटील, हमरापूर विभाग मूर्तिकार संघटना अध्यक्ष जयेश पाटील, खजिनदार कैलास पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक मोकल, मुंबईचे मूर्तिकार सुरेश शर्मा, धुळ्याचे राजेंद्र चित्ते आदिंसह महाराष्ट्रातील असंख्य कारखानदार, कारागीर उपस्थित होते.

यावेळी अधिक माजी आमदार तटकरे म्हणाले की पीओपीची बंदी न्यायालयात आहे त्या दृष्टिकोनातून आपण हा लढा अनेक दिवस लढत आहोत त्यामुळे आपला हा बंदी उठवण्याचा लढा मंत्री आदिती तटकरे, पंकजा मुंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासमवेत एक समिती स्थापन करून योग्य अहवाल न्यायालयात सादर करण्यास राज्य सरकारला भाग पाडू त्यामुळेच विघ्नहर्ता आपल्यावर आलेले हे विघ्न नक्कीच बाप्पा दूर करेल असे सांगून मूर्तिकारांच्या लढ्याला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी देखील आपला पाठिंबा गणेश मूर्तिकार संघटनेला असल्याचे सांगून वेळप्रसंगी राजकारण सोडीन पण मूर्तिकारांच्या पाठिंब्याला आपण बळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पीओपी बंदीमुळे गणपती कारखानदार आणि त्यावर निगडित असणारे लाखो हात बेरोजगार होणार आहेत.शासनाने मूर्तिकारांना विश्वासात न घेता जी गाईडलाईन दिली आहे त्याचा आम्ही निषेध करत असून वर्षातून दोन वेळा होणाऱ्या गणेशोत्सवातून प्रदूषण होत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर राज्यातील कंपन्यांमार्फत जो प्रदूषण होत आहे तो तुम्हाला दिसत नाही का ? याकरिता आम्ही आमचा लढा न्याय मिळेपर्यंत कायम ठेवू

अभय म्हात्रे – अध्यक्ष – महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटना

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.