
शनिवार दिनांक ८ जानेवारी रोजी कुटुंबिनी महिला संघ उरण चा हळदिकुंकू समारंभ महाराष्ट्र भुषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी शाळेत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला.
कुटुंबिनी नावातच मायेचा ओलावा, बंध आपुलकीचे असल्याने उरणमधील समस्त महिलांसाठी हि एक आनंदाची, आपली कला दाखविण्याची संधीच उपलब्ध करून दिली आहे या कार्यक्रमातून. अशा या बहारदार कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या लावणी सम्राज्ञी मेघा घाटगे, भाजप च्या निताताई बालदी, राष्ट्रवादी काँग्रेस च्या भावना घाणेकर, माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजपच्या शैलजा ताई घरत, प्रतिक्षा डायस जी एम पटेल ज्वेलर्स,आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन गणेशाची पुजा करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले पाहुण्यांच्या स्वागता नंतर कुटुंबिनी महिला संघ उरण च्या संस्थापिका आरती ढोले व अध्यक्षा श्लोक पाटील यांनी प्रास्ताविक वाचले त्यानंतर मान्यवरांनी आपल्या भाषणातून महिलांना प्रोत्साहित केले. कुटुंबिनी महिला संघ उरण च्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रिती पाटील (स्केटिंग प्रशिक्षक,)मानसी सि़ग ( मेकअप आर्टिस्ट,)रणिता ठाकूर (पत्रकार), कल्पना सुर्वे (सामाजिक कार्य) पल्लवी शिंदे (इ़टरनॅशनल मेकअप आर्टिस्ट) म्हणून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये ज्युनिअर सलमान खान (जोहेब सय्यद) ची एन्ट्रींने खूप रंगत आणली तसेच लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे यांनी आपल्या दिलखेचक अदांनी लावणीच्या नृत्याने घायाळ केले. त्याचप्रमाणे महिला कलाकारांना या हळदीकुंकू समारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली कला दाखविण्याचे व्यासपिठ मिळाले.एक से बढकर एक असे नृत्य ,गाणी, एकपात्री अभिनय फॅशन शो अशा कार्यक्रमांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. हळदीकुंकू म्हणून पटूल ज्वेलर्स कडून महिलांना एक सौभाग्य अलंकार वाण म्हणून देण्यात आले. तसेच लकी कुपन द्वारे विजेत्या दोन महिलांना पटेल ज्वेलर्स कडून मानाची पैठणी देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या हरहुन्नरी शैलीने दर्शना माळी यांनी केले. तर निशा म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी व सुनियोजित होण्यासाठी कुटुंबिनी महिला संघाच्या आरती ढोले (संस्थापिका ) श्लोक पाटील,(अध्यक्षा ) दिपिका माळी,(कार्याध्यक्षा )नयना धोत्रे (उपाध्यक्षा), वृषाली पवार (सचिव), प्रियांका घरत (सहसचिव) शुभांगी शिंदे (सहसचिव ),निशा म्हात्रे (खजिनदार )गायत्री माळी (सह खजिनदार), प्रिया मयेकर (जनसंपर्क ),दर्शना गावंड (जनसंपर्क), कल्पना सुर्वे (जनसंपर्क), रिद्धी पाटील (सल्लागार), संगीता साळुंखे (सल्लागार), सविता डेरे (सल्लागार) ,रश्मी गावंड (सदस्या), सुप्रिया राक्षीकर ( सदस्या ),प्रशाली सावंत( सदस्या ),मानसी सिंग (सदस्या ),ऋतुजा बंसल( सदस्या ),साची साहतीया (सदस्या) आदीं चे योगदान महत्त्वपूर्ण आहे.



Be First to Comment