Press "Enter" to skip to content

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक २०२५ भव्य क्रीडा महोत्सव 

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती तर कामोठेत व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा

पनवेल (प्रतिनिधी) उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ०६ ते ०९ फेब्रुवारी पर्यंत भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. 

      नमो चषक अंतर्गत दिनांक ६ ते ९ फेब्रुवारी पर्यंत खारघर मधील सेक्टर १४ येथील जय हनुमान चेरोबा बापदेव मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धा, कामोठेमधील सेक्टर ६ येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या मैदानावर दिनांक ०७ फेब्रुवारीला व्हॉलीबॉल स्पर्धा, ०८ फेब्रुवारी रोजी रस्सीखेच तर ०९ फेब्रुवारीला फुटबॉल स्पर्धा होणार आहे. तर ०९ फेब्रुवारी रोजी कळंबोली मधील सेक्टर १६ येथे भव्य कुस्ती स्पर्धा होणार आहे. 

        खारघर येथे भव्य टेनिस क्रिकेट सामने दिवस रात्र अशा स्वरूपात होणार असून या स्पर्धेतील विजेत्या संघास १ लाख ११ हजार १११ रुपये, उपविजेत्यास ५५ हजार ५५५ रुपये तर तृतीय क्रमांकाच्या संघास ३३ हजार ३३३ रुपये तसेच मॅन ऑफ दि सिरीजला दुचाकी मोटारसायकल आणि दररोज लकी ड्रॉ अशी भरघोस पारितोषिके क्रिकेट स्पर्धेसाठी आहेत. 

         कामोठे येथे होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला १५ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला १० हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये व चषक, फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघास २० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १० हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला ५ हजार रुपये आणि सर्व विजेत्या संघास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रस्सीखेच स्पर्धा पुरुष व महिला अशा गटात होणार आहे. यामध्ये पुरुष गटातील प्रथम क्रमांकाला ७ हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक ५ हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये व चषक, महिला गटातील प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक ५ हजार रुपये व चषक तर तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये व चषक तसेच प्रत्येक फेरीतील विजेत्या संघाला रोख १ हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरूप आहे. 

         कळंबोली येथे ०९ फेब्रुवारीला होणाऱ्या भव्य कुस्ती स्पर्धेत रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख (सोलापूर) विरुद्ध रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोल (पंजाब) यांचा खास आकर्षण सामना होणार असून यामधील विजेत्या पैलवानास पाच लाख रुपये व मानाची गदा, तर महिलांच्या गटात महाराष्ट्र चॅम्पियन पै. अमेधा घरत (पनवेल) विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. अंकिता फातले (कोल्हापूर) यांचा खास आकर्षण सामना होणार असून विजेत्या पैलवानाला ५१ हजार रुपये व मानाची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुषांच्या गटात महाराष्ट्र चॅम्पियन पै. निखिल कदम विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. अनिल कचरे, पै. शुभम वळखडे विरुद्ध पै. आकाश दुबे, पै. श्रेयश कचरे विरुद्ध  पै. सुशांत देवमाने,  पै. साजन पावशे विरुद्ध  पै. निलेश कदम, आणि  पै. समाधान घनपट विरुद्ध विजय घुले यांच्या सामना रंगणार आहे. महिला गटात  पै. स्नेहा येवले विरुद्ध वैष्णवी यादव आणि  पै. रितिका कारंडे विरुद्ध गौरी जाधव यांचा विशेष सामना होणार आहे. कुस्ती स्पर्धेतील महिला ३५, ४० व ४५ किलो वजनाखालील गटातील प्रत्येकी विजेतीला १ हजार रुपये तर उपविजेतीस  ५०० रुपये, ५० किलो खालील गटातील विजेतीला १५०० रुपये व तर उपविजेतीस १ हजार रुपये, ५५ किलो वजनाखालील गटातील विजेतीला २ हजार रुपये तर उपविजेतीस १५०० रुपये आणि ५७ ते ७६ किलो वजनाखालील गटातील विजेतीस १० हजार रुपये व नमो केसरी मानाची गदा तर द्वितीय क्रमांकाला ५ हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला ३ हजार रुपये, १७ वर्षाखालील मुले गटातील ३०, ३५, ४० व ४५ किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकास प्रत्येकी १ हजार रुपये तर द्वितीय क्रमांकाला ५०० रुपये, ५० व ५५ किलो खालील गटातील प्रथम क्रमांकाला प्रत्येकी १५०० रुपये द्वितीय क्रमांकास प्रत्येकी १ हजार रुपये, ६०, ६५ आणि ७० किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकास अनुक्रमे २ हजार रुपये, ३ हजार रुपये आणि ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास अनुक्रमे १५००, २ हजार आणि ३ हजार रुपये, वरिष्ठ मुले ५० ते ६० किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकाला ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये, ६० ते ७० किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकाला ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये, ७० ते ७९ किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकाला ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये, तसेच ७९ ते १२५ किलो वजनाखालील गटातील प्रथम क्रमांकाला १० हजार रुपये व नमो केसरी मानाची गदा, द्वितीय क्रमांकास ५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाला ३ हजार रुपये असे कुस्ती स्पर्धेत एकूण ८ लाख ५१ हजार रुपयांच्या बक्षिसांचे स्वरूप आहे. मागील महिन्यात उलवा नोडमध्ये नमो चषक मोठ्या भव्य स्वरूपात आणि दिमाखदारपणे पार पडले. सात हजाराहून अधिक स्पर्धकांनी आणि हजारो क्रीडारसिकांनी या स्पर्धेचा लाभ घेतला होता. त्याच अनुषंगाने या स्पर्धाही भव्य दिव्य आणि उत्कृष्ट नियोजनात होणार आहेत. त्यानुसार या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.