Press "Enter" to skip to content

वाहतूक सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटकडून आरोग्य शिबिराचे आयोजन

महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांच्या वतीने डॉ. सुरेश कुमार मेकला, अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरक्षा अभियान राबवले जात असून त्यात आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले होते. महामार्ग सुरक्षा पथकाचे रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले.

लायन्स क्लब ऑफ खोपोली, अपोलो हॉस्पिटल आणि समर्पण ब्लड बँकच्या वतीने दि. 13 जाने 2025 रोजी डॉ. रामहरी धोटे सभागृहात संपन्न झालेल्या शिबिरात खोपोली पोलीस स्टेशनचे कर्माचारी आणि अधिकारी, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, खालापूर टोल नाक्यावरील कर्मचारी, खोपोली रिक्षा चालक-मालक संघटनेचे सदस्य त्याच सोबत अनेक वाहन चालक मालकांसमवेत नागरिकांनी उस्पूर्त सहभाग घेतला होता.

रक्तदानाचे परम कर्तव्य पार पाडले गेले. तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून शिबिरार्थींनी डोळे तपासणी, रक्तदाब, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, हाडांची आणि मणक्यांची तपासणी, कान – नाक – घसा तपासणी, ई सी जी आणि जनरल चेकअप करवून घेतले. याच शिबिरात प्रथम उपचाराची आणि सी पी आरची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली. अपोलो हॉस्पिटल संचलित नव्याने दाखल झालेल्या फाईव्ह जी कार्डियाक ॲम्बुलन्सची विस्तृत माहितीही देण्यात आली.

या शिबिराच्या संपन्नतेसाठी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपाधीक्षक जोत्स्ना रासम, पोलीस निरीक्षक पनवेल विभाग भरत शेंडगे, खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शितल राऊत, महामार्ग वाहतूक पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल शिंदे, लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे पदाधिकारी, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांचा मोलाचा सहभाग होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.