
रोहा : समीर बामुगडे
रोहा तालुक्यातील वरसे गावात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तेजस पडवळ (वय 25) आणि त्याचे दोन सहकारी आरोपी असल्याचे आरोप आहेत.अनुप पडवळ याचाही यात समावेश असून, यापूर्वी देखील चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत .
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत कारवाई करत तिघांविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
स्थानिक नागरिकांचा आक्रोश :
स्थानिक गावकऱ्यांनी पोलिस ठाण्याबाहेर जमून संताप व्यक्त केला असून, या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) करून आरोपींना कठोर शिक्षा, तसेच फाशीची मागणी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलावीत आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पोलिस तपास :
पोलिसांकडून आरोपींविरोधात अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणाला गांभीर्याने घेत पोलीस प्रशासन आरोपींना लवकरात लवकर न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती दिली आहे.




Be First to Comment