
लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमतर्फे आंतरशालेय कराओके गायन स्पर्धेचे आयोजन
पनवेल-शरीर हे संगीत आहे आणि आत्मा हा आवाज आहे,कराओके स्पर्धा ही हौशी गायकांसाठी व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन बाठीया हायस्कूलचे मुख्याध्यापक भगवान माळी यांनी केले. ते लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमतर्फे आयोजित आंतर शालेय कराओके गायन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. त्यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि सरगम क्लबचे या स्तुत्य उपक्रमाच्या आयोजनातून नवीन कलाकारांना संधी आणि आत्मविश्वास मिळतो असे सांगितले.
सरगम क्लबच्या अध्यक्ष मानदा पंडित यांनी क्लबतर्फे सर्वांचे स्वागत केले आणि स्पर्धकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार मानून पुढील महिन्यात खुल्या कराओके स्पर्धेला सुद्धा प्रतिसाद देण्याचे आवाहन केले.
या स्पर्धांना पनवेल परिसरातील विद्यार्थ्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला.
एकुण 3 गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद खालील स्पर्धकांनी पटकावले.
इ. चौथी पर्यंत प्रथम क्रमांक – कैवल्य लोंढे, द्वितीय क्रमांक प्रांजल ठाकूर तर तृतीय क्रमांक हृतिका जैन
इ. 5 वी ते 7 वी
प्रथम क्रमांक – कैवल्य पवार, द्वितीय क्रमांक – कृतिका देवळे, तृतीय क्रमांक – आदेश शेडगे आणि
इ. 8 वी ते 10 वी
प्रथम क्रमांक – स्नेहा शेलार
द्वितीय क्रमांक – स्वर म्हात्रे
तृतीय क्रमांक – जिया फडके
पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे रिजन चेअरमन सुयोग पेंडसे यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले तसेच सर्व स्पर्धकांनी अतिशय सुंदर गाणी सादर केली असे सांगुन या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सीनिअर/ज्युनिअर के जी मधील मुलांचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी उपस्थित झोन चेअरमन अलकेश शहा यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रांतपाल एन आर परमेश्वरन, आणि जी एस टी चेअरमन विजय गणात्रा यांनी उपस्थिती देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला.
याप्रसंगी पालकांचे वतीने ऍड. सुरेखा भुजबळ यांनी सरगम क्लबचे या उपक्रमाच्या सुंदर आयोजनाबद्दल आभार मानले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणुन सतीश मोरे आणि महेश ठक्कर यांनी काम पाहिले. दोन्ही परीक्षकांनी स्पर्धकांना मोलाच्या सूचना दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गोडसे यांनी केले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी स्वाती गोडसे, प्रेमेंद्र बहिरा, धवल शहा, जयेश मणियार, संध्या महानुभाव, ओमकार खेडकर आणि मिलिंद जोशी यांनी मोलाचे सहकार्य केले.




Be First to Comment