
शाळेसंबंधीच्या अनेक गोड आठवणी असतात त्यातील एक महत्त्वाची आठवण म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन दरवर्षी साधारण डिसेंबर च्या शेवटी किंवा जानेवारी च्या सुरुवातीला वार्षिक स्नेहसंमेलन होत असते. यावेळी विविध प्रकारच्या स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते.तसेच वर्षभरातील सर्वोत्तम कामगीरी केल्याचे श्रम साफल्य म्हणजे स्नेहसंमेलन.
पेण तालुक्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे सार्वजनिक माध्यमिक विद्यामंदिर रावे पेण शाळेचे
वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दिनांक ३ जानेवारी व शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या स्नेहमेळाव्याचे नियोजित अध्यक्ष मा. श्री बी आर पाटील साहेब (अध्यक्ष ग्रामविकास शिक्षण प्रसार प्रसारक मंडळ रावे तथा निवृत्त पोलीस उप-अधीक्षक)मा. श्री रवीशेठजी पाटील साहेब
(विद्यमान आमदार पेण सुधागड रोहा मतदारसंघ) मा. श्री विठ्ठलराव बळवंतराव देसाई (निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त) मा.श्री राजेंद्र जी पालवे सर (सुधागड एज्युकेशन सोसायटी) मा. श्री संजय कुमार ब्राह्मणे (पोलीस निरीक्षक दादर सागरी पोलीस स्टेशन जोहे) आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे ग्रामविकास शिक्षक मंडळ सर्व पदाधिकारी व सदस्य, माता -पिता पालक संघ,सखी सावित्री संघ ग्रामस्थ रावेआदींची उपस्थिती लाभली.
मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन,दिपप्रज्वलन , करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थींनीनी ईशस्तवन व स्वागतगीत गाऊन वातावरण मंगलमय केले.याच कार्यक्रमाचा दुग्धशर्करा योग म्हणजे या
कार्यक्रम निमित्त लहान व मोठ्या गटात हस्तकला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शनांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम टी पाटील सर व एस के ठाकूर सर यांनी केले तर सुत्रसंचालन मेघना म्हात्रे मॅडम यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व त्यांना शालेय जीवनातील स्पर्धा व परिक्षेसाठी यशस्वी होण्यासाठी आपल्या भाषणातून प्रोत्साहन दिले. फक्त माणूस असून चालत नाही तर माणूस म्हणून वागता यायला पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन पाहूण्यांनी यावेळी केले.
त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक ३ जानेवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बाह्य परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा ,गणित संबोध परीक्षा, कला व क्रीडांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले.या विद्यामंदिराची विशेष बाब म्हणजे गेली ११ वर्षे इयत्ता १० वीचा निकाल शंभर टक्के लागण्याची परंपरा आहे.
शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सांस्कृतिक प्रमुख एम टी पाटील सर व मेघना म्हात्रे मॅडम यांनी केले. या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मेघना मॅडम श्री ठाकूर सर यांनी केले .
सदरचा हा कार्यक्रम रावे शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री शेंडगे सर, यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदररित्या पार पडले. कार्यक्रम सुनियोजित व शिस्तबद्ध होण्यासाठी ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ रावे अध्यक्ष सर्व पदाधिकारी व सदस्य ,तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




Be First to Comment