
प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट सिंधी पंचायत ट्रस्ट आम्ही रक्तदाते पनवेलचे विद्यार्थी वाहक संघटना पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पाच जानेवारी 2025 रोजी पूज्य सिंधी पंचायत मंदिर पनवेल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिनाचे उद्घाटन श्री अमित देवानी, ऍड श्री मनोहर सचदेव, श्री पांडुरंग हुमणे, मुरलीधर ढाके सौ संगीता साखरे यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेविका सौ दर्शना भोईर व पत्रकार संजय कदम व एडवोकेट विजय भगत यांनी सदिच्छा भेट दिली.
या रक्तदान शिबिरामध्ये पनवेलचे सुप्रसिद्ध बिल्डर गिरीश कासट , किसन रौंधल यांनी रक्तदान केले या वेळी अड श्री अमोल शंकर साखरे यांनी आपले जीवनातील शंभरावे रक्तदान पूर्ण केले.
या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला
यावेळी एकूण 121 रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला तसेच आरोग्य तपासणी शिबिराला पनवेलकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. सदर रक्तदान शिबिर यशस्वी व्हावे याकरिता श्री भूषण चोंणकर, सचिन भिसे, यांनी विशेष परिश्रम घेतले.




Be First to Comment