Press "Enter" to skip to content

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

पनवेल (प्रतिनिधी ) भारत घडवणारे व भारतीय जनता पक्षाचेज्येष्ठ नेते, भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारीवाजपेयी यांची १०० वी जयंती आज (दि. २५) पनवेल तालुकाव शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहातसाजरी करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह इतर पदाधिकारी वकार्यकर्त्यांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.       

           यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिवादन केल्यानंतर आदरांजली वाहताना म्हंटले कि, आपला देशआपले लाडके माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारीवाजपेयी यांची १०० वी जयंती अर्थात सुशासन दिवस साजरा करत आहे. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे मुत्सद्दी राजकारणीम्हणून ते आजही अगणित लोकांना प्रेरणा देत आहेत. त्यांनीआधुनिक भारताची उभारणी करण्याचे स्वप्न पाहिलेहोते. देशातील सर्वांना विशेषत: गरीब आणि वंचितघटकांना केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले.  त्याच वेळी त्यांच्यासरकारने अनेक आर्थिक सुधारणा करून भारताच्या आर्थिकउत्थानाचा पाया रचला.  त्याच मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा काम करत आहेत. अटलजींनी आपल्या जीवन प्रवासातसमृद्ध साहित्यकृतींच्या निर्माता असलेल्या या लेखक आणिकवी मनाच्या व्यक्तिमत्त्वाने आपल्या लेखनात शब्दांचा वापरहा प्रेरणा देण्यासाठी, विचार करायला प्रवृत्त करण्यासाठीकेला. ते सर्व वयोगटातील लोकांच्या मनात घर करून राहिलेआहेत. भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सारख्या असंख्यकार्यकर्त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वातून शिकता आले आहे. आपल्या देशाच्या क्षमतेवर असलेला अटलजींचा अढळविश्वास आपल्या सर्वांना उच्च ध्येय आणि कठोर परिश्रमकरण्यासाठी सतत प्रेरणा देत आहे, असेही त्यांनी नमूद करतआदरांजली वाहिली. 

        यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस अमित ओझे, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव,  माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, कामगारनेते जितेंद्र घरत, युवा मोर्चाचे दिनेश खानावकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, अशोकसाळुंखे, महेश पाटील, राम म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, काळुरामफडके, नवनाथ पाटील, आकाश फडके, सुदेश फडके, विजयपाटील, किशोर चौतमोल, आकाश यांच्यासह कार्यकर्तेउपस्थित होते. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.