
रोहा,दि.१४(प्रतिनिधी)
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे ता.रोहा येथे मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील नामांकित दीपक नायट्रेट कंपनी यांच्या दीपक फाऊंडेशन रोहा यांच्या वतीने सदरील आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
या मोफत आरोग्य तपासणीत विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करून व शारीरिक तपासणी करून शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक दिपक जगताप,दिपक फाऊंडेशन रोहाचे डॉ.प्रियंका धनावडे, परिचारिका अश्विनी म्हसकर,काॅन्सिलन्ट उत्कर्षा म्हस्के,डाटा एंट्री आॅपरेटर सेजल घोरपडे आदी उपस्थित होते.




Be First to Comment