Press "Enter" to skip to content

पनवेल वासीयांना कायमस्वरूपी पाणी मिळावा यासाठी पनवेल महानरापालिकाआयुक्तांना कॉंग्रेस शिष्टमंडळाचे साकडे

पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक दिवसापासून अनेक समस्या नागरिकांमध्ये भेडसावत आहेत त्यामधील पिण्याच्या पाण्याची समस्या ही प्राथमिकता असून त्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी तसेच पनवेलच्या नागरिकांना कायमस्वरूपी पाणी मिळावा यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पनवेल महानरापालिका आयुक्तांनापत्र देण्यात आले तसेच  पाण्याच्या समस्यासाठी मोरबे धरणावर लक्ष केंद्रित करावे अशी सूचना देण्यात आली व नोकर भरतीमध्ये स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे असे सांगण्यात आले व गोर गरीब नागरिकांना वैद्यकीय सेवेसाठी पनवेल क्षेत्रामध्ये ठराविक (Private) हॉस्पिटल मध्ये तरतूद करण्यात यावी अश्या विविध नागरिकांच्या समस्यां घेऊन कॉंग्रेसचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटून या विषयांवर चर्चा करून या समस्यांवर योग्य ती कार्यवाही व्हावी असे पत्राद्वारे कळविण्यात आले.

यावेळी, पनवेल शहर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, जेष्ठ नेते शशिकांत बांदोडकर, पनवेल शहर जिल्हा महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, पनेवल शहर जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर मोरे, पनवेल शहर जिल्हा युवक क्रीडा अध्यक्ष राकेश जाधवव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.