Press "Enter" to skip to content

दत्तजयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यात एकूण २३ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन !

रायगड – प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती उत्सव देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्त्व नेहमीच्या तुलनेत १ हजार पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची उपासना जेवढी अधिक करू, तेवढा उपासकाला आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो. या अनुषंगाने दत्ताच्या उपासनेसह अध्यात्म, साधना आणि अन्य विविध विषयांवर भाविकांना शास्त्रीय माहिती मिळावी, यासाठी दत्त जयंतीच्या निमित्ताने शनिवार, १४ डिसेंबरला सनातन संस्थेच्या वतीने देशातील अनेक राज्यांत विशेष ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यात एकूण २३ ठिकाणी ही ग्रंथप्रदर्शने लावण्यात येणार आहेत.

या ग्रंथप्रदर्शनांवर दत्तगुरुंच्या नामजपाचे महत्त्व, पूर्वजांचा त्रास दूर होण्यासाठी दत्ताची उपासना का करावी ? दत्तगुरुंनी केलेले २४ गुणगुरु कोणते आणि त्यांच्याकडून ते काय शिकले ? आदी दत्तगुरुं विषयी माहिती देणारे ग्रंथ उपलब्ध असतील. ‘दत्त’विषयक ग्रंथांसह अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळविषयीची सिद्धता, आयुर्वेद, आरोग्य, प्रथमोपचार आदी विषयांवरील ग्रंथ तसेच दत्ताच्या नामजपाच्या पट्टया, दत्ताचे सात्त्विक चित्र यांसह सनातनची सात्त्विक उत्पादने सनातन संस्थेच्या वतीने या ग्रंथप्रदर्शनांवर उपलब्ध असतील. 

सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनांची काही महत्त्वाची ठिकाणे :

१. श्री. दत्त मंदिर,एस.टी बस डेपो,महाड
२.श्री दत्त मंदिर,एसटी बस स्थानक,पेण
३. श्री दत्त मंदिर,देऊळवाडी, उरण
४.श्री नवनाथ मंदिर,पनवेल
५. श्री दत्त मंदिर,,भोवाळे,चौल,अलिबाग
६. दत्त मंदिर,नागोठणे
७. दत्त मंदिर, एमआयडीसी कॉलनी, मोहोपाडा,रसायनी
८. दत्त मंदिर,शेडवली,खोपोली
९. दत्त मंदिर,नौपाडा गाव,सेक्टर २२,कामोठे
१०. दत्त मंदिर,कळंबोली पोलीस स्टेशन सेक्टर-१ ई,,कळंबोली.

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी तसेच वरील ठिकाणासह अन्य ठिकाणच्या ग्रंथ प्रदर्शनाविषयी माहिती हवी असल्यास 9819242733. या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.