Press "Enter" to skip to content

नागोठणे जैन समाजाच्या वतीने नगरचार्य पालखी सोहळा थाटात संपन्न

नागोठणे ( याकूब सय्यद ) नागोठणे गावात दीडशे वर्षांपूर्वी नगर चार्य निघाली होती त्यानंतर दिनांक 11.12.2024 रोजी सकाळी आठ वाजता जैन मंदिरासमोरील आराधना भवन येथून जैन समाजाच्या वतीने 17 रथातून पालखी सोहळा काढण्यात आला होता. पालखी सोहळा नागोठणे बाजारपेठ शिवाजी चौक नुकड गल्ली जोगेश्वरी मंदिर तसेच प्रभु आळी गांधी चौक खुमाचा नाका या परिसरातून भक्ती गीत तसेच बँड बाजा वाद्य वाजवीत सतरा रथामध्ये तीर्थंकर देव व देवी देवाची मूर्ती ठेवून सदरील जनचार्या पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.

नागोठणे नगरीवर सुख शांती समृद्धी आणि अध्यात्म उन्नतीसाठी जीवनभर आपली कृपादृष्टी ठेवणारे नागोठणे अधिष्ठायक 8 वे तीर्थकर परमात्मा श्री चंद्रप्रभु स्वामी दादा ची दीडशे वर्षां नंतर नगरचार्य म्हणजेच मंदिरातून बाहेर पालखीतून प्रदक्षिणा मारणे हा कार्यक्रम मार्गशीष शुद्ध एकादशी दिनांक 11 12 2024 रोजी सकाळी आठच्या दरम्यान साजरा करण्यात आला यावेळी दुःख दारिद्र्य नाश होऊन सर्व प्रकाराची भरभराटी व्हावी म्हणून जैन अजैन सर्वांच्या घरी अमृत वर्षा व्हावी या करिता पुष्प वर्षाव करण्यात आला, असून त्यांच्या कृपा दृष्टीने सर्वांना सुख शांती लाभावी अशा भावना मनापासून भाविकांमधून व्यक्त करण्यात आले.

नागोठणेकरांनी नगरचार्य पालखीचे घरोघरी रांगोळी काढून पूजा अर्चना ओवाळणी पुष्पांजली करीत स्वागत केले या धार्मिक मंगल कार्यक्रमात प्रचंड जैन समाजातील भाविक उपस्थित होते नगरचार्य पालखी सोहळा कार्यक्रमाची सांगता दुपारी एक वाजता झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.