Press "Enter" to skip to content

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे वतीने चिल्हे येथेविद्यार्थ्यांना सायकलचे वाटप


खांब (नंदकुमार मरवडे) रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथे चेअरमन महेंद्र पोटफोडे यांच्या विशेष प्रयत्नातून १०९ गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम ता.११ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.

तालुक्याचे नेते कै.दत्ताजीराव गणपतराव तटकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदाई चॅरिटेबल
ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वरूपातील सायकल वाटपाचा कार्यक्रम चिल्हे येथे संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला पं.स.मा.उपसभापती बाबूराव बामणे, सचिव धोंडू कचरे, संचालक धनाजी लोखंडे, सुभाष माटल,मा.विद्यार्थी विश्वनाथ जाधव, मुख्याध्यापक दिपक जगताप, नरेंद्र माळी आदींसह संचालक रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे,धोंडू कचरे, धनाजी लोखंडे ,युवा नेते नरेंद्र जाधव,मनोज शिर्के, सरपंच कांचन मोहिते, उपसरपंच योगेश धामणसे, मुख्याध्यापक सुरेश जंगम,दिपक जगताप, अर्चना मरवडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी खांब हायस्कूल येथील ९५ तर विठ्ठलवाडी हायस्कूल येथील १४ विद्यार्थ्यांना सदरील सायकलींचे वाटप करण्यात आले.आमच्या ग्रामीण भागातील दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या सायकलींचा नक्कीच चांगला फायदा होऊन त्यांची दररोजची पायपीट वाचणार आहे.याशिवाय शारीरिक तंदुरुस्तीसाठी या सायकलींचा चांगला फायदा होणार असल्याने खा.सुनील तटकरे,आ.आदिती तटकरे व मा.आ.अनिकेत तटकरे यांना विशेष धन्यवाद देत असल्याचे आपल्या मनोगतातून चेअरमन महेंद्र पोटफोडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.