
खांब,दि.९(नंदकुमार मरवडे) रोहा तालुक्यातील पिंपळवाडी-देवकान्हे येथे ता.१४ रोजी दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
सलग १५ वर्षांची यशस्वी परंपरा राखत संपन्न होणाऱ्या या उत्सव सोहळ्यानिमित्त पहाटे अभिषेक व पूजाविधी,सकाळी ११ वा.श्री.सत्यनारायणाची महापूजा,महाआरती, तद्नंतर सायं.६ वा.कोकण दिंडी वारकरी संप्रदाय रोहा यांची हरिपाठ सेवा,रात्रौ.८ ते ९ महाप्रसाद, तद्नंतर ह.भ.प.दिनेश महाराज कडव यांची सुश्राव्य हरि किर्तनरूपी व जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.या सर्व कार्यक्रमांचे यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व महिला मंडळ पिंपळवाडी -देवकान्हे,तसेच तरूण मंडळ मोलाचे सहकार्य करीत आहेत.




Be First to Comment