Press "Enter" to skip to content

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर के) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा 

उरण : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर के) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा उरण यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांना पाठिंबा दिला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर के) चे पक्षाध्यक्ष राजाराम खरात यांनी प्रीतम जे एम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला. प्रीतम म्हात्रे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा उरण अध्यक्ष पंकज सोनावळे यांनी प्रीतम जे एम म्हात्रे यांना पाठिंबा देऊन सर्व पदाधिकारी, पक्षाशी निगडित असलेल्या तमाम आंबेडकरी जनता आणि सर्वसामाजिक संस्थेच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे. या वेळी प्रीतम जे एम म्हात्रे यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.