Press "Enter" to skip to content

प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ रविवार 17 नोव्हेंबर रोजी करंजाडे आणि मोहोपाडा हद्दीत बाईक रॅली आणि सभेचे आयोजन

उरण : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ रविवार 17 नोव्हेंबर रोजी करंजाडे आणि मोहोपाडा हद्दीत बाईक रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

       १७ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत चिंचवन ब्रिज, शिरढोण स्टॉप, सांगुर्ली स्टॉप, तूरमाळे स्टॉप, पळस्पे स्टॉप, नांदगाव स्टॉप, जेएनपीटी हायवे वरून माणघर श्री स्वामी समर्थ मठ, भंगार पाडा, कुंडे वहाळ, ओवळे फाटा, दापोली पारगाव स्टॉप, कोल्ही आर 3, कोपर वाघिवली वाडा आर फोर, चिंचपाडा सेक्टर एक, दोन, करंजाडे सेक्टर तीन रिलायन्स मॉल, करंजाडे सेक्टर पाच ,सहा करंजाडे सेक्टर 4, कॉलेज फाटा वडघर स्टॉप येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत प्लॉट 42, सेक्टर चार, करंजाडे पनवेल येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

चौक आणि वासांबे येथे सायंकाळी चार वाजता चौक शहर, नढाल, त्यानंतर वरोसे, लोधीवली, दांडफाटा, रीस, कांबे, चांभारली, मोहोपाडा येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत अचानक क्रिकेट क्लब मैदान, मोहोपाडा येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रचार रॅलीला आणि सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.