Press "Enter" to skip to content

कामगार नेते महेंद्र घरत यांची जागतिक भरारी!


     ITF या जागतिक संघटनेवर एक्सिक्यूटिव्ह बोर्ड मेंबर पदी निवड

पनवेल/ प्रतिनिधी.
 जगातील तब्बल १६० देश सभासद असलेल्या  इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF ) लंडन या बहुराष्ट्रीय संघटनेचे अधिवेशन १२ ते १९ ऑक्टोबर रोजी मोरोको येथे सुरु आहे. दिनांक १४ ऑक्टोबर रोजी या बहुराष्ट्रीय संघटनेच्या जागतिक कार्यकारिणीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भारत देशातून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची एक्सिक्युटीव्ह मेंबर पदी निवड करण्यात आली. जिथे भारतीयांना प्रतिनिधीत्व मिळत नव्हते तिथे आपल्या नेतृत्व कौशल्याने कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी भारतीयांचा झेंडा रोवला त्याबद्दल त्यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरानातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.