५२ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ
पनवेल (प्रतिनिधी)
पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा धडाका सुरु आहे. त्यानुसार सोमवारी सुमारे ५२ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ भाजपाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला. पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून वांगणी येथे स्मशान भुमी, वांगणीमधील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मोहो येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरुस्ती आणि मोहो पाडा येथील अंगणवाडी ते गणपती घाट पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भुमीपूजन सोमवारी संपन्न झाले तसेच यावेळी ८ लाख रुपयांच्या निधीमधून मोहो पाडा मधील अंगणवाडी ते स्मशानभुमी पर्यंत झालेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाऱ्या कामाचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते झाले.
या कामांच्या भुमीपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भुपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, सरपंच सुरेखा पवार, अशोक पवार, माया कातकरी, गोविंद कातकरी, कमलाकर पुजारी, विष्णू कातकरी, संतोष कातकरी, बबन कातकरी, प्रविण कातकरी, मोहन कातकरी, गोविंद घरत, बाळाराम पाटील, नामदेव दळवी, माजी सरपंच प्रमोद घरत, विठ्ठल पाटील, अप्पा पाटील, रवी घरत, गणेश पाटील, प्रसाद शिंदे, सुरेश कातकरी, मयुर घरत, माजी उपसरपंच अरुण जळे, अनंता पाटील, प्रविण म्हात्रे, सतिष मालुसरे, अक्षता म्हात्रे, विठ्ठल भोईर, अण्णा भोईर, अनंता पाटील, खंडू भोईर, गुरुनाथ भोईर, शैलजा भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Be First to Comment