Press "Enter" to skip to content

ओम सर निघाले लंडनला !

पनवेल/प्रतिनिधी

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे स्वीय सहाय्यक व कार्यकर्त्यांचे आवडते “ओम सर” ​अर्थात ओम शेखर देशमुख हे आपल्या पुढील मास्टर या शिक्षणासाठी लंडन येथील हर्टफोर्टशायर विद्यापीठ मध्ये शनिवार दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी रवाना ​झाले. ​तत्पूर्वी त्यांच्या शुभेच्छा समारंभाचे आयोजन ​एम जी ग्रुपच्या च्या वतीने (सिद्धीविनायक बॅक्वेट)येथे शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. यावेळी ओमकार देशमुख यांचे  आई वडील व मित्र मंडळ तसेच एम जी ग्रुप  चे सर्व सभासद उपस्थित होते.
अतिशय कमी वयात अतिशय व्यस्त रहात  १२-१२ तास काम करून सर्व कार्यकर्त्यांचे कॉल,महेंद्र शेठ यांच्या सर्व  देश विदेशातील बैठका,कामगार क्षेत्र,राजकारणातील वेळापत्रक सांभाळून अल्पवेळात ओम देशमुख यांनी आपल्या प्रेमळ,मितभाषी  व अविश्रांत परिश्रमाचे जोरावर सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आणि घरत परिवाराच्या हृदयात स्थान मिळवले आहे. अश्यातच त्यांनी आपल्या व्यग्र शेडयूलमध्येसुद्धा आपले पदवीचे शिक्षण उत्तम रीतीने पूर्ण करून व्यवस्थापन क्षेत्रात मुंबई विद्यापीठातून पदवी संपादीत केली. महेंद्र घरत यांनी त्याला दिलेल्या आश्वासनानुसार पुढील शिक्षणा साठी लंडन येथे पाठवण्याचा निर्णय अमलात  आणून  त्याला हर्टफोर्टशायर विद्यापीठ लंडन येथे  मिळवून प्रवेश मिळवून देत  पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.