Press "Enter" to skip to content

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दी.७ जानेवारी रोजी कर्जत (जि.रायगड) येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आज करण्यात आले.

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन आणि उल्हासनदी किनारी प्रति पंढरपूर – आळंदी येथील श्री विठ्ठलाच्या 52 फूट उंच मूर्तीचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

कर्जतच्या दहिवली चौक येथे धर्मवीर संभाजी महाराज स्मारक, जिजामाता उद्यानातील शिवसृष्टी तसेच कर्जत शहरातील 14 कोटी रुपये खर्चाच्या प्रशासकीय भवनाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. भजनसम्राट गजाननबुवा पाटील सभागृहाचे भूमिपूजन तसेच 90 कोटी रुपये खर्चाच्या कर्जत – चौक काँक्रिट रस्ता, 140 कोटी खर्चाच्या खोपोली येथील मलनिःसारण प्रकल्प येथे भुयारी गटार,खालापूर येथे ग्रामीण रुग्णालयाचे माथेरान येथील 47 कोटी खर्चाच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे आणि माथेरान डोंगरातील किरवली ते जुम्मा पट्टी येथील बारा आदिवासी वाड्या यांना जोडणाऱ्या 18 कोटी खर्चाच्या ररस्त्याचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच कर्जत मध्ये १०० खाटांचे रुग्णालय लवकरच उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कर्जतवासियांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकसाठी 5 कोटी रुपये आणि कर्जत नळ पाणी पुरवठा योजनेस मान्यता देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री आमदार महेंद्र थोरवे, भरत गोगावले, महेंद्र दळवी, सदा सरवणकर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.