Press "Enter" to skip to content

महेंद्रशेठ घरत यांनी तेलंगणा मधे केला मोहम्मद अझरूद्दीन  यांचा प्रचार !

 

          तेलंगणा मधील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला जोर चढला असून रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या सहकाऱ्यांच्यासह जुबिली हिल्स तेलंगणा विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार, भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान मोहम्मद अझरूद्दीन यांच्या प्रचारात सहभाग घेतला. तेलंगणामधे काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर तेथील सर्वसामान्य जनता विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महेंद्रशेठ घरत यांच्या समवेत वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावंकर, फिशरमन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मार्तंड नाखवा, रायगड जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अखलाख शिलोत्री हे सुद्धा चार दिवस काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.