युवा नेतृत्व समीर म्हात्रे यांनी मातोश्री वर जाऊन बांधले शिवबंधन
चांदा ते बांदा सत्तापरिवर्तन करणार – उध्दव ठाकरे
सिटी बेल ∆ पेण – वार्ताहर ∆
पेण तालुक्यातील युवा नेतृत्व आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा एक कट्टर शिवभक्त हिंदुत्वाचीआणि मशाल हाती घेऊन सदैव तत्पर असलेला मावळा,माजी नगरसेवक यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थिती मातोश्री येथे जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी समीर म्हात्रे यांच्यासोबत शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी देखील उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे शिवबंधन हाती बांधले.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे आज झालेले प्रवेशाने आम्ही प्रभावित झालो असुन इथेच नाही तर संपूर्ण राज्यात चांदा ते बांदा सत्तापरिवर्तन घडऊन आणण्याची आम्ही शपथ घेतली असल्याचे जाहीर केले.
यावेळी प्रवेश करताना शिवसेना माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संपर्क प्रमुख विष्णू पाटील, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे,उद्योगपती रशाद मुजावर, महीला आघाडी जिल्हा संघटीका दीपश्री पोटफोडे, तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, युवा तालुका अधिकारी राकेश मोकल आदी उपस्थित होते.
आजचा हा प्रवेश म्हणजे लढवय्यांचा प्रवेश आहे. लढवैयांच्या पक्षात आपण प्रवेश केला आहात. काहींचा आव मोठा होता पण जसे आम्ही डोळे वटारले तसे पळकुटे निघाले अशा प्रकारची टीका त्यांनी विरोधकांवर केली. यापुढे आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असुन चंदा ते बांदा सत्ता परिवर्तनाचे वारे वाहताना आपल्याला दिसतील असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलतांना सांगितले.
तर प्रवेश झाल्यानंतर आपले मत व्यक्त करताना समीर म्हात्रे यांनी आज आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवबंधन बांधले असून पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली आहे.हे हिंदुत्व टिकऊन ठेवण्यासाठी आणि मराठी माणूस टिकून राहण्यासाठी सर्वांनी उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे असे सांगितले.
Be First to Comment