Press "Enter" to skip to content

काँग्रेसची मावळ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक

काँग्रेसच्या मावळ्यांनो मावळ लोकसभा जिंकण्यासाठी सज्ज व्हा आमदार प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सिटी बेल ∆ पनवेल ∆

आज संपूर्ण देशभरात काँग्रेस पुन्हा नव्याने भरारी घेत आहे अशात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वासाची कमी राहता कामा नये. मावळ लोकसभा मतदारसंघ काँग्रेस जिंकू शकतो हा आत्मविश्वास किंबहुना अति विश्वास असला तरी चालेल परंतु न्यूनगंड अजिबात असता कामा नये असा कानमंत्र देत काँग्रेसच्या मावळ्यांनो मावळ लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन आज आमदार प्रणिती शिंदे यांनी पनवेल येथे केले.

आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाराट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनीही आपली संपूर्ण टीम कामाला लावलेली आहे. मावळ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी काँग्रेस पक्षाची वाघीण समजल्या जाणाऱ्या लढाऊ आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. मावळ लोकसभेत रायगड जिल्ह्यातील पनवेल,उरण व कर्जत -खालापूर विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या तिन्ही विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी आज आमदार प्रणितीताई शिंदे सकाळी 9:30 वाजता काँग्रेस भवन पनवेल येथे दाखल झाल्या. त्यांच्या मार्गदर्शनाने पनवेल काँग्रेसमध्ये नवं चैतन्य निर्माण झाले.

सदरील आढावा बैठकीस चारुलता टोकस, रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, रायगड जिल्हा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, किरीट पाटील, निर्मला म्हात्रे, श्रुती म्हात्रे, कॅप्टन कलावत, मल्लिनाथ गायकवाड, हेमराज म्हात्रे, लतिफ शेख यांच्यासह पनवेल, उरण, कर्जत- खालापूर मधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.