पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या घंटागाड्या नियमितपणे येत नसल्याची तक्रार पनवेल शहर जिल्हा काँग्रेस महिला आघाडीने मांडली. गुरुवारी पनवेल जिल्हा महिलां कॉग्रेस अध्यक्षा निर्मला म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपायुक्त प्रशांत रसाळ यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांना विविध नागरी समस्यांबाबत अवगत केले. यावेळी शिष्टमंडळाने निवेदन देऊन या सर्व समस्यांचे निराकरण करावे अशी विनंती केली.
यावेळी पनवेल जिल्हा महिलां कॉग्रेस अध्यक्षा निर्मला म्हात्रे; सरचिटणीस निता शेणॉय; चिटणीस रेश्मा खान ब्लँक अध्यक्षा आरती ठाकूर; या पदाधिकारी उपस्तीत होत्या.





Be First to Comment