Press "Enter" to skip to content

खारघर येथील महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्याची न्यायालयीन चौकशी करा

महाविकास आघाडी शिंदे-फडणवीस सरकार विरोधात आक्रमक

निष्पाप श्री सदस्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

पनवेल/ प्रतिनिधी. दी 24 एप्रिल.

२० लाख श्री सदस्य संप्रदाय खुश करण्याच्या उद्देशाने रणरणत्या उन्हात महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आयोजन करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारच्या न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी पनवेल उरण महाविकास आघाडी च्या वतीने करण्यात आली.पनवेल उरण महाविकास आघाडी च्या वतीने पनवेल येथील काँग्रेस भवन पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार राज्यातील जिल्ह्यांच्या ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत असून महाविकास आघाडी मधील घटक पक्ष काँग्रेस पक्षाच्या सोबत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकं येणार आहेत हे माहित असून देखील आच्छादित मांडव का नाही घातला?आम्ही मंचावरील सारी मंडळी थोर निरुपणकार महाराष्ट्रभूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान आणि आदर करणारे आहोत. त्यांच्या श्री संप्रदायावर सारे आयोजन सोडले असते तरीही सारे काही सुरळीत आले असते. परंतु शक्ती प्रदर्शन करू पाहणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारला अप्पासाहेबांच्या सत्कारापेक्षा अमित शहा यांच्यावर इम्प्रेशन मारणे जास्त महत्वाचे वाटत होते. असे काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक रमेश किर म्हणाले. ते म्हणाले कि नियोजनात अनेक त्रुटी होत्या त्यामुळे साऱ्या सोहळ्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे पाहिजे आणि निष्पाप श्री सदस्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. प्रशांत पाटील आणि गणेश कडू यांनी देखील अयोजकांच्यावर शाब्दिक आसूड ओढत शिंदे फडणवीस सरकारच्या प्रसिद्धीच्या अट्टाहासाचे हे बळी असल्याचे म्हटले. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक रमेश किर,राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील,पनवेल शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष सुदाम पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस चे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील,कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, शेकाप चे पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर काँग्रेस च्या पनवेल तालुका ओबीसी सेल चे अध्यक्ष वैभव पाटील,पनवेल शहर काँग्रेस अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लतीफ शेख,काँग्रेस च्या पनवेल शहर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा निर्मला ताई म्हात्रे,पनवेल शहर जिल्हा महिला आघाडी कार्याध्यक्षा शशिकला सिंग,युवक काँग्रेस चे रायगड जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे,शिवसेनेचे रामदास पाटील,विश्वास पेटकर,काँग्रेस चे पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष अमित लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.