Press "Enter" to skip to content

ग्लोबल हेल्थ फेस्टिवल अंतर्गत थालेसेमिया पेशंट साठी रक्तदान शिबिराचे आयोजन

UNCCN योगमुडा अभियानात विनामूल्य रुग्णसेवेची पर्वणी

ग्लोबल हेल्थ फेस्टिवल अंतर्गत थालेसेमिया पेशंट साठी रक्तदान शिबिराचे आयोजन

      बेलापूर नवी मुंबई येथील UNCCN या रुग्णसेवेसाठी वाहून घेतलेल्या संस्थेच्या वतीने ग्लोबल हेल्थ फेस्टिवल अंतर्गत थालेसेमिया पेशंट साठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. येत्या महिन्याच्या 21 तारखेला हे शिबिर संपन्न होणार आहे. रक्तदान शिबिरासोबतच विनामूल्य चाचण्या आणि तज्ञांचे मार्गदर्शन अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन देखील या निमित्ताने करण्यात येणार आहे.
         UNCCN कॉर्पोरेट क्लिनिक्स ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची नावाजलेली संस्था रुग्णसेवेमध्ये नित्यनेमाने नवनवीन उपक्रम राबवित असते. या संस्थेच्या वतीने आयोजित ग्लोबल हेल्थ फेस्टिवल अंतर्गत 21 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. थॅलेसेमिया या असाध्य रोगाने पीडित रुग्णांना या शिबिरामध्ये जमा होणारे रक्त दिले जाणार असल्याचे संस्थेचे संचालक वैभव सोनटक्के यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तसेच यावेळी कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी वर्ग तथा बेलापूर सह अन्य नवी मुंबईतील रहिवासी यांच्याकरिता विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले आहे. मधुमेह, हृदयरोग,त्वचा आणि केस विकार, कर्करोग, वंध्यत्व उपचार, कॉस्मेटोलॉजी, नेत्रचिकित्सा दंतचिकित्सा, एक्यूप्रेशर, फिजिओथेरपी आणि योग विद्या याबाबत तज्ञ डॉक्टरांच्या कडून विनामूल्य तपासण्या आणि उपचार केले जातील. याशिवाय स्ट्रेस डायट, योगमुडा आणि म्युझिक थेरपी या फारशा माहीत नसणाऱ्या उपचार पद्धतींबाबत देखील रुग्णांना अवगत करून दिले जाईल असे सोनटक्के म्हणाले.
          याच अभियानाच्या अंतर्गत एप्रिल महिन्याच्या 28 ते 30 तारखांच्या दरम्यान UNCCN कॉर्पोरेट क्लिनिक्स आउटडोर कॅम्पेन राबविणार आहे. तपासणी आणि उपचार विनामूल्य असले तरी देखील गर्दीचे नियोजन करण्याच्या उद्देशाने पूर्व नोंदणी आवश्यक असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मेडी लॅब हे या अभियानात लॅबोरेटरी पार्टनर म्हणून कार्यरत असणार आहेत. पूर्व नोंदणीसाठी किंवा अधिक माहितीसाठी 8433553109/02246037647 या क्रमांकावर संपर्क साधावा.
        

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.