सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील चिखले येथील एकमेव शासनमान्य सैनिकी शाळा विजय आर्मी अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सहावी आणि सातवीमध्ये प्रवेशासाठी रविवारी प्रवेश परीक्षा होत आहे.
रविवार ०२ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता परीक्षा शाळेच्या ठिकाणीच होईल. त्याशिवाय खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आणि ओबीसी संवर्गातील सातवी ते दहावी या वर्गातील काही रिक्त जागांसाठी तसेच अकरावी विज्ञान शाखेसाठी ऑफलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
शाळेच्या शिक्षणाचे माध्यम सेमी इंग्रजी असून अनिवासी विद्यार्थ्यांसाठीही प्रवेशाची सोय उपलब्ध आहे. पालकांना ९८६७३०१७२५, ९८६७१२१९६२ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








Be First to Comment