राज्यस्तरीय तायक्वॉन्डो स्पर्धेत वेद मोरे ला सुवर्ण पदक
सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆
१६ ते १८ मार्च २०२३ दरम्यान चिपळूण मधिल सावर्डे येथील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या ३२ व्या महाराष्ट्र राज्य सबज्युनियर तायक्वांडो स्पर्धेत रायगडच्या वेद मोरे ने सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत २४ जिल्ह्यातून ६७२ स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेत भाग घेतलेल्या रायगड तायक्वॉन्डो असोसिएशनच्या वेद विलास मोरेने पुण्याच्या श्लोक कामठे चे तगडे आव्हान मोडीत काढत सुवर्णपदक पटकाविले. वेदने पहिल्या फेरीत वेद काळंबे (पालघर) याचा २४-४ ने पराभव केला, दुसऱ्या फेरीत अक्षत खाडेकर (औरंगाबाद) १४-५ याचा तर उपांत्य फेरीत मलिक पठाण (सोलापूर) याचा १५-३ असा सहज पराभव करून आपल्या वेगवान खेळाने वेदने अंतिम फेरीत पुण्याच्या श्लोक कामठेचा १८-७ असा पराभव करीत सुवर्ण पदकावर आपली मोहोर उमटवली.
वेद मोरेची २४ ते २८ मार्च २०२३ दरम्यान जे. एन. इनडोर स्टेडियम कटक,ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वॉन्डो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वेद ला स्पर्धेसाठी रायगडचे प्रमुख प्रशिक्षक सुभाष पाटील सहाय्यक प्रशिक्षक संतोष पालेकर, तेजस माळी, मच्छिंद्र मुंडे, राकेश जाधव, अक्षता भगत, सोनू वडगीर आदींचे मार्गदर्शन लाभले.
वेदवर समाजातील अनेक मान्यवरांकडू अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Be First to Comment